Zing Marathi Movie SAAM TV
मनोरंजन बातम्या

Zing Marathi Movie : टाळ्या अन् शिट्ट्यांचा गजर; 'झिंग' चित्रपट येतोय, रिलीज डेट काय?

Zing Release Date : 'झिंग' चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. 'झिंग' चित्रपट प्रेम, जिद्द आणि कलेची आवड यांचे बीज पेरणारा आहे.

Shreya Maskar

संगीतमय नजराणा घेऊन 'झिंग' चित्रपट येत आहे.

'झिंग' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

'झिंग' चित्रपट कलेची आवड जपणारा आहे.

स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. कुणी आई-वडिलांचे, कुणी स्वतःचे तर कुणी पत्नीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करणे यांत खरं साहस आहे. स्वप्न पूर्ण करण्यात लागलेल्या एका किसनाची कथा लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. गावातील उनाड पण मनाने सच्चा आणि स्वप्नवेड्या किसनाच्या वडिलांचे अपूर्ण राहिलेले तमाशाचा फड उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या मेहनती लेकाचा प्रवास 'झिंग' (Zing ) या नव्याकोऱ्या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात ही मैफील किसना कशी रंगवणार? हे पाहणे या चित्रपटात रंजक ठरेल. आजोबांचा विरोध, गावकऱ्यांचा अविश्वास आणि पाटलांच राजकारण यातून मार्ग काढत किसना वडिलांचे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रंगमंच गाजवणार का? हा कठीण प्रवास तो पार करणार का? हे सारं चित्रपटात पाहायला मिळेल. चित्रपटात दिसणारा हा किसना नेमका कोण आहे? ही रंगतदार भूमिका कोण साकारतय याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. मात्र अद्याप याचा खुलासा झाला नाही आहे. शिवाय चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार हे देखील अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

'झिंग' चित्रपटाचे निर्माते दिपक पेटकर आणि सौरभ किरणकुमार कुंभार आहेत. तसेच चित्रपट दिग्दर्शन अमित वाल्मिक कोळी यांनी केले आहे. संपूर्ण चित्रपट प्रताप जोशी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. नृत्य दिग्दर्शन म्हणून आशिष पाटील यांनी बाजू सांभाळली आहे. 'झिंग' हा चित्रपट संगीतमय मैफिलीत अनेक रंग भरणारा आहे.

'झिंग' कधी रिलीज होणार?

'झिंग' चित्रपट येत्या 19 सप्टेंबरपासून प्रदर्शित होणार आहे. गावच्या मनात प्रेम, जिद्द आणि कलेचे बीज किसना पेरु शकेल का? की, हे सगळं फक्त त्याच्या स्वप्नापुरत मर्यादित राहील याचा उलगडा 'झिंग' मधून लवकरच होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको करत फोडल्या गाड्या

Election Commission: निवडणुकांपूर्वी मतमोजणीच्या नियमात मोठा बदल; EVMच्या आधी पोस्टल बॅलेटची होणार मोजणी

IND vs WI: भारताच्या पाच खेळाडूंची कसोटी कारकीर्द संपुष्टात! विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी संघाच्या घोषणेतून स्पष्ट संकेत

Maharashtra Live News Update: बीडमध्ये उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा; शेतकऱ्यांचा संवाद

Beed Rain : बीडला अतिवृष्टीचा तडाखा, तब्बल चार एकर जमीन गेली वाहून| VIDEO

SCROLL FOR NEXT