नवनवीन विषय आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या झी स्टुडिओजने आता मराठी प्रेक्षकांसाठी एक स्टायलिश आणि रुबाबदार लव्हस्टोरी घेऊन येण्याची तयारी केली आहे. ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिल्याच झलकितून चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही टॅगलाईन सध्या प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
टीझरमधून एका डॅशिंग आणि आत्मविश्वासू तरुणाची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. ही केवळ गोड प्रेमकहाणी नसून, प्रेमासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असलेल्या नायकाची रुबाबदार गोष्ट आहे. स्वतःचे नियम स्वतः ठरवणारा हा नायक आणि त्याची ड्रीम गर्ल यांची प्रेमकहाणी तरुणाईला नक्कीच भावणारी आहे. चित्रपटात भावना आणि स्वॅग यांचा योग्य समतोल साधण्यात आला असल्याचे टीझरवरून स्पष्ट होते.
दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांच्या मते, ‘रुबाब’ हा ठाम विचार आणि स्वतःचा आवाज असलेल्या आजच्या तरुणाईची कथा आहे. आजच्या पिढीचे प्रेम प्रामाणिक असते आणि त्यात एक वेगळा अॅटिट्यूड असतो, तोच रुबाब या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जनावलेकर म्हणतात की, मराठी प्रेक्षकांना नेहमीच नवीन, फ्रेश आणि स्टायलिश आशयाची अपेक्षा असते. ‘रुबाब’ हा चित्रपट केवळ रोमँटिक नसून, स्वतःच्या तत्वांवर जगण्याची आणि प्रेमासाठी ठाम उभे राहण्याची कथा मांडतो.
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले आहे. संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ‘रुबाब’ हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.