Shirwale Recipe: कोकणातील स्पेशल नारळाच्या दुधातील शिरवाळे कसे बनवायचे? वाचा रेसिपी

Siddhi Hande

खाद्यसंस्कृती

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती खूप मोठी आहे. प्रत्येक ठिकाणी काही न काही स्पेशल पदार्थ बनवले जातात.

Shirwale Recipe

नारळाच्या दुधातील शेवया

कोकणातील शिरवाळे खूप प्रसिद्ध आहेत. शिरवाळे म्हणजेच नारळाच्या दुधातील शेवया.

Shirwale Recipe

साहित्य

तांदळाचे पीठ, पाणी, तूप, मीठ, नारळाचे घट्ट दूध, गूळ, वेलची पूड, मीठ

Shirwale Recipe

पाणी उकळून घ्या

सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. त्यात तूप आणि मीठ टाका.

Shirwale Recipe

उकड काढा

पाणी उकळल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून उकड काढा. याच्याच तुम्हाला शेवया बनवायच्या आहेत.

Shirwale Recipe

शेवया पाडून घ्या

यानंतर तुम्हाला शेवयाच्या साच्यात तांदळाचे पीठ टाकून त्याच्या शेवया पाडून घ्या.

Shirwale Recipe

शेवया वाफवून घ्या

यानंतर एका टोपात पाणी गरम करायचे आहे. त्यावर चाळणी ठेवून त्यात शेवया ठेवा. शेवया ५-७ मिनिटे वाफवून घ्या.

Shirwale Recipe

नारळाचे दूध

यानंतर तुम्हाला एका भांड्यात नारळाचे दूध घ्यायचे आहे. त्यात गूळ, वेलची पूड आणि मीठ टाकून गरम करायचे आहे. दूध जास्त उकळून नका.

Shirwale Recipe

नारळाचा रस

यानंतर गरम शेवयांवर नारळाचा रस ओतून गरमागरम खाऊ शकता.

Shirwale Recipe

Next: होळी स्पेशल घरच्या घरी बनवा थंडगार आणि क्रीमी लस्सी, वाचा सोपी रेसिपी

Holi Special Lassi Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा