Holi Special Lassi Recipe: होळी स्पेशल घरच्या घरी बनवा थंडगार आणि क्रीमी लस्सी, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

होळीला थंडगार लस्सीचा खास आनंद

रंगांच्या सणात गोड, थंड आणि ताजेतवाने पेय म्हणून लस्सी उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्यावर शरीराला गारवा देण्यासाठी ही रेसिपी परफेक्ट ठरते.

Holi Special Lassi Recipe | Saam Tv

साहित्य

२ कप घट्ट दही, ४-५ चमचे साखर (चवीनुसार), ½ कप थंड दूध, ४-५ बर्फाचे तुकडे, ¼ चमचा वेलची पूड, सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स (बदाम, पिस्ता)

Holi Special Lassi Recipe | Saam Tv

लस्सी बनवण्याची सोपी पद्धत

मिक्सरमध्ये दही, साखर आणि दूध घालून चांगले फेटून घ्या. मिश्रण गुळगुळीत झाल्यावर त्यात बर्फ आणि वेलची पूड घालून पुन्हा एकदा ब्लेंड करा.

Holi Special Lassi Recipe | Saam Tv

परफेक्ट कन्सिस्टन्सी टिप्स

लस्सी खूप घट्ट वाटत असल्यास थोडे दूध घाला. पातळ वाटल्यास आणखी थोडे दही मिसळा. लस्सी नेहमी फेसाळ आणि क्रीमी असावी.

Holi Special Lassi Recipe | Saam Tv

फ्लेवर्ड लस्सीचे पर्याय

होळी स्पेशल म्हणून केशर-पिस्ता लस्सी, गुलाब लस्सी किंवा आंबा लस्सीही बनवू शकता. रंगीबेरंगी फ्लेवर्समुळे सणाची मजा दुप्पट होते.

Holi Special Lassi Recipe | Saam Tv

सजावट कशी करावी?

तयार लस्सी ग्लासमध्ये ओतून वरून ड्रायफ्रूट्स, केशर किंवा गुलाब पाकळ्या घालून सजवा. थोडी मलाई टाकल्यास चव अधिक वाढते.

Holi Special Lassi Recipe | Saam Tv

लस्सी पिण्याचे फायदे

दही पचनासाठी चांगले असते आणि शरीराला थंडावा देते. होळीच्या धावपळीत ऊर्जा टिकवण्यासाठी लस्सी उत्तम पेय आहे.

Holi Special Lassi Recipe | Saam Tv

Rashmika-Vijay Wedding Photo: 'माझी बायको... माझा नवरा...'; रश्मिका-विजयच्या शाही लग्नाचे फोटो व्हायरल

Rashmika-Vijay Wedding Photo | Saam Tv
येथे क्लिक करा