Aishwarya Nagesh Host IPL 2024 Event Instagram
मनोरंजन बातम्या

मराठमोळ्या अभिनेत्रीने IPL चं केलं होस्टिंग, व्हिडीओ शेअर करत सांगितला कसा होता पहिला अनुभव

IPL 2024 In Aishwarya Nagesh: सध्या सर्वत्र आयपीएलची क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक क्रिकेटप्रेमी आयपीएलचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत.

Chetan Bodke

Aishwarya Nagesh Host IPL 2024 Event

सध्या सर्वत्र आयपीएलची (IPL 2024) क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक क्रिकेटप्रेमी आयपीएलचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. क्रिकेटप्रेमींना आयपीएलमधील क्रिकेट सामना मराठीसह हिंदी आणि इंग्रजीमध्येही पाहायला मिळत आहे (Entertainment News). (Marathi Actress)

सध्या आयपीएलमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीची चर्चा पाहायला मिळत आहे. ‘देवमाणूस’ (Devmanus Serial) फेम ऐश्वर्या नागेश (Aishwarya Nagesh) सध्या ही आयपीएलमध्ये होस्टिंग करताना पाहायला मिळत आहे. याबद्दलची माहिती अभिनेत्रीने स्वत: इन्स्टाग्रामवरून दिली असून आयपीएलमध्ये होस्टिंग करतानाचा अनुभवही तिने चाहत्यांसोबत शेअर केलेला आहे. (IPL)

अभिनेत्री ऐश्वर्या प्रकाश नागेशने गेल्या काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री, आयपीएलचे अँकरिंग करताना दिसत आहे. (Tv Serial)

व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने अँकरिंग करतानाचा अनुभवही शेअर केला आहे. "२६ मार्च २०२३... आयपीएलमध्ये अँकरिंग करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मनामध्ये भीती, दडपण आणि उत्साह घेऊन मी स्टुडिओत पोहोचली. त्या दिवशीचे शोचे गेस्ट सिद्धेश लाड आणि अतुल बेदाडे हे होते. अनेक नवीन गोष्टी मला इथे पाहायला आणि शिकायला मिळाल्या. सोबतच, यावेळी अनेक तांत्रिक गोष्टीदेखील समजून घेता आल्या. आता नवीन येणाऱ्या शूटसाठी मी उत्सुक आहे." असं अभिनेत्री त्या व्हिडीओमध्ये म्हणाली. (Social Media)

ऐश्वर्या नागेश ही एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री असून ती एक होस्ट सुद्धा आहे. त्यासोबतच ऐश्वर्या नागेश ही न्यूज टिव्ही अँकरही आहे. ऐश्वर्याने झी मराठीवरील ‘देवमाणूस’ मालिकेमध्ये मुख्य भूमिकाही साकारली आहे. मालिकेमध्ये, तिने अपर्णा नावाचे पात्र साकारले होते. तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत किरण गायकवाड, अस्मिता देशमुख, नेहा खान, माधुरी पवार, विरल माने, रुक्मिनी सुतार हे कलाकारही होते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT