Savlyachi Janu Savali Saam Tv
मनोरंजन बातम्या

Savlyachi Janu Savali: 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत नवा ट्विस्ट; सारंग-अस्मीच्या लग्नात सावलीची घोड्यावरून एन्ट्री

Savlyachi Janu Savali : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ सध्या एका मोठ्या नाट्यमय वळणावर आली आहे. या मालिकेत सावली घोड्यावरून एन्ट्री करत सारंग-अस्मीचं लग्न धांबवणार आहे.

Shruti Vilas Kadam

Savlyachi Janu Savali : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ सध्या एका मोठ्या नाट्यमय वळणावर आली आहे. सारंग आणि अस्मीच्या लग्नाच्या दिवशी, सावलीने घोड्यावरून थेट विवाहमंडपात प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधले. या धक्कादायक एन्ट्रीने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

सावलीने विवाहमंडपात पोहोचताच, तिने आकार या व्यक्तीला थेट सामोरे जात, "आकार, तूच सारंगसरांना मारण्याचा प्रयत्न केलास," असे म्हणत त्याच्या कानाखाली मारले. त्यानंतर, आकारने कबूल केले की, हे सर्व त्याने अस्मीच्या सांगण्यावरून केले होते. या खुलाशामुळे अस्मीच्या खऱ्या चेहऱ्याचा उलगडा झाला आणि उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले.

या प्रसंगात, काही गुंड सावलीवर हल्ला करण्यासाठी पुढे आले, पण तिचा मानलेला भाऊ आणि पोलीस अधिकारी देवा वेळेवर पोहोचून तिला वाचवतो. देवाने गुंडांशी झटापट करत, "आला रे आला, आता देवा आला," अशी डायलॉग बाजी करतो. त्यानंतर सावलीची लग्न मंडपात घोड्यावरुन एन्ट्री होताना दाखवली आहे. लग्न मंडपात येऊन ती बोलते अस्मी आता तुझा खेळ खल्लास...!

सावलीच्या या धाडसी कृतीने, अस्मीच्या खोटेपणाचा पर्दाफाश झाला असून, सारंगच्या आयुष्यातील खरे प्रेम कोणाचे आहे, यावर प्रकाश पडला आहे. या नाट्यमय वळणानंतर, मालिकेतील पुढील घडामोडी काय असतील, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. सावली आणि सारंगच्या नात्याचा पुढील प्रवास कसा असेल, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valache Birde Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा वालाचा बिरडा कसा बनवायचा?

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Live News Update : पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

राज्यातील सर्व शाळा उद्या बंद; पुण्यात उद्या शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा एल्गार

SCROLL FOR NEXT