Shocking! १७ वर्षीय टिकटॉकर तरुणीची गोळ्या घालून हत्या; ऑनर किलिंगचा संशय

Sana Yousaf: पाकिस्तानातील 17 वर्षीय प्रसिद्ध टिकटॉकर सना यूसुफची तिच्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना इस्लामाबादच्या G-13 सेक्टरमध्ये सोमवारी रात्री घडली.
Sana Yousaf:
Sana YousafSaam tv
Published On

Sana Yousaf: पाकिस्तानातील 17 वर्षीय प्रसिद्ध टिकटॉकर सना यूसुफची तिच्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना इस्लामाबादच्या G-13 सेक्टरमध्ये सोमवारी रात्री घडली. सना ही चितराल येथील रहिवासी असून, तिच्या टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर चार दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोराने पाहुण्याच्या रूपात घरात प्रवेश केला आणि जवळून गोळ्या झाडल्या, ज्यामुळे सना यूसुफचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सना यूसुफचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) येथे पाठवण्यात आला आहे. तपासादरम्यान, सना आणि हल्लेखोर यांच्यात हत्येच्या काही क्षणांपूर्वी घराबाहेर संवाद झाला असल्याचे आढळले आहे.

Sana Yousaf:
Actor Scandal: सौरव गांगुली बायोपिकमधून 'या' कलाकराची हकालपट्टी; अनेक महिलांशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप

या घटनेनंतर सोशल मीडियावर #JusticeForSanaYousaf हा हॅशटॅग ट्रेंड होत असून, अनेकांनी दुःख आणि संताप व्यक्त केला आहे. सना यूसुफ महिला अधिकारांसाठी सक्रिय होती आणि तिच्या रील्समधून महिला सशक्तीकरणाचा संदेश देत होती. तिच्या अचानक आणि हिंसक मृत्यूमुळे नेटकरी शोक व्यक्त करत आहेत. ही घटना पाकिस्तानातील महिला आणि सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींसाठी असुरक्षिततेचे प्रतीक मानली जात आहे.

Sana Yousaf:
Traditional Daily Wear Suit: वेदर फ्रेंडली 'हे' ट्रेडिशनल सूट नक्की ट्राय करा, तुम्ही दिसाल कम्फर्टेबल आणि कॉन्फिडन्ट

पोलिसांनी या प्रकरणात ऑनर किलिंगचा मुद्दा तपासण्यास सुरुवात केली आहे. सना यूसुफच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. या घटनेने पाकिस्तानातील ऑनर किलिंगच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे, जिथे दरवर्षी शेकडो महिला कुटुंबाच्या सन्मानाच्या नावाखाली बळी पडतात. मानवाधिकार संघटनांनी या प्रकरणात निष्पक्ष आणि जलद तपासाची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com