Paru Marathi Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Paru: झी मराठीवरील 'पारू' मालिकेत नवा ट्विस्ट; या अभिनेत्याची होणार धमाकेदार एंट्री

Paru Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पारू’ सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. मालिकेच्या कथानकात सध्या नवे वळण येताना दिसत आहे.

Shruti Vilas Kadam

Paru Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘पारू’ सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. मालिकेच्या कथानकात सध्या नवे वळण येताना दिसत आहे. या मालिकेत आता अभिनेता सक्षम कुलकर्णी याची दमदार एंट्री झाली असून, मालिकेचा ट्रॅक अधिक रंजक बनणार आहेत.

सक्षम कुलकर्णीने याआधी मराठी चित्रपटसृष्टीत आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ‘पारू’मध्ये त्याची एन्ट्री एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी झाली आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये सक्षमचा दमदार अंदाज पाहायला मिळतो आहे. ज्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. त्याच्या पात्रामुळे पारूच्या आयुष्यात नवे संकट येणार की नव्या आशा? याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.

सक्षम कुलकर्णीने मालिकेत प्रवेश करताच पारूच्या आयुष्यात नवे बदल घडताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या पात्राचे पारूच्या कुटुंबाशी असलेले संबंध आणि पुढील कथानक कशा प्रकारे उलगडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मालिकेच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी सरप्राइज एन्ट्री ठरली आहे.

मालिकेतील या नव्या वळणामुळे ‘पारू’ आणखी मनोरंजक होणार आहे. सक्षम कुलकर्णीचा प्रवेश ही केवळ एक पात्राची भर नव्हे, तर मालिकेच्या संपूर्ण ट्रॅकला दिशा देणारा निर्णय ठरणार आहे, असं म्हणायला हरकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT