Myra Vaikul  canva
मनोरंजन बातम्या

Myra Vaikul : मायरा झाली मोठी ताई ; सोशल मीडियाद्वारे दिली गोड बातमी

Myra Vaikul Welcomes Brother: मायरा वायकुळच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन. सोशल मीडियावर केली गोड बातमी शेअर.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दिली होती. या मालिकेतून घराघरात पोहचलेली परी म्हणजेच बाल कलाकार मायरा वायकूळ. मायराने तिच्या निरागस अभिनयामुळे अनेक प्रेशक्षकांची मनं जिंकली होती. सोशल मीडियावरुन प्रेक्षकांपर्यंत पोहचलेल्या मायराने अगदी कमी वयामध्ये चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मालिकेनंतर मायराने अनेक जाहिरातींमध्ये आणि इतर कार्यक्रमांमध्ये देखील अभिनय केला आहे. मायराने इतक्या लहान वयामध्ये तिच्या सुंदर आणि निरागस अभिनयामुळे इंडस्ट्रीमध्ये एक वेगळचं स्थान निर्माण केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मायराच्या आई-बाबांनी त्यांच्या सोशल मीडियावरून चाहत्यांना खूशखबर दिली होती. "लवकरच मायरा मोठी ताई होणार" अशी माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यांच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

मराठी नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी मायराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या आई आणि बाबांनी ही गोड बातमी दिली होती. त्यावेळी मायराची आई श्वेता वायकूळ सप्टेंबरमध्ये तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार अशी माहिती देण्यात आली होती.तर आजच मायराच्या आईने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.मायराला भाऊ झाला आहे. मायराने मोठी ताई झाल्याच्या आनंदामध्ये एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा गाऊन घातला आहे. मायराने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं तिच्या हातामध्ये बेबी बॉय नावाचा एक बोर् घेतल्याचं दिसत आहे. तर शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या मागे तिचे आई-वडील आहेत.

मायराने तिच्या सोशल मीडियावर लहान बाळाबद्दलची गुडन्यूज शेअर केली आहे. मायराने त्या पोस्टला "आमचा छोटा सुपरहिरो आला" असं कॅप्शन दिलं आहे. मायराच्या रिल्सचं तिचे फॅन्स भरभरुन कौतुक करतात. कोणत्याही सणाला किंवा कार्यक्रमाचा दिवस असल्यास मायराचे छान आणि हटके व्हिडिओज तिच्या सोशल मीडियावर शेअर केले जातात.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 'हे' नॅचरल फॅट बर्नर पदार्थ रोज खा!

Congress: 'बिडी-बिहार'च्या पोस्टनं राजकारण तापलं; वादानंतर काँग्रेसचा माफीनामा

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

SCROLL FOR NEXT