तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक
मुंबईहून गोरखपूरला निघालेल्या महिलेने रेल्वेतच मुलाला जन्म दिल्याची घटना आज घडलेली आहे. धावत्या रेल्वेतच महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या. त्यानंतर तिने रेल्वेमध्येच एका गोंडळ बाळाला जन्म दिलाय. नाशिक स्थानकादरम्यान ही घटना आज सकाळच्या सुमारास घडलेली आहे. या घटनेबाबत सविस्तर आपण जाणून घेवू या.
या महिलेचं नाव रिफा असं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की, रिफा तिच्या नातेवाईकांसोबत मुंबईहून गोरखपूरला (Nashik News) निघाली होती. परंतु इगतपुरी सोडल्यानंतर रिफा यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या होत्या. अचानक गाडीमध्ये वेदना सुरू झाल्याने मात्र मोठा गोंधळ उडाला होता. परंतु गाडीमध्ये कुठेच थांबा घेणार नव्हती. रेल्वे थेट नाशिकरोड येथे थांबणार होती. परंतु ट्रेनमधील इतर प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी मदतीला धावले.
प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांना कळवत पुढे स्थानिक डॉक्टर आणि आरोग्याची यंत्रणा तयार ठेवली (Woman Delivery In Running Train) होती. देवळाली कॅम्प हे स्थानक सोडताच महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. नाशिकरोड स्थानकामध्ये गाडी पोहोचतात या महिलेसह बाळाला महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात (Nashik News In Marathi) आलंय. कृषीनगर एक्सप्रेसमध्ये सर्वसाधारण डब्यातच या महिलेची प्रसुती झाल्याचं समोर आलंय.
रेल्वेमधील इतर प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत केल्यामुळे या महिलेच्या कुटुंबीयांची मोठी मदत झालीय. त्यांनी रेल्वे प्रशासनाचे मदतीबद्दल आभार मानले आहेत. महिलेला धावत्या रेल्वेमध्येच वेदना सुरू झाल्या (Train gave birth to child In Railway) होत्या. त्यानंतर ट्रेनमध्येच तिने बाळाला जन्म दिल्याचं समोर आलंय. सध्या हा विषय खूप चर्चेचा बनलेला आहे. मुंबईहून गोरखपूरला निघालेल्या कृषीनगर एक्सप्रेसमध्ये ही घटना घडलेली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.