Devmanus Marathi Serial: झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिका सतत धक्कादायक वळण येत आहे आणि आता मालिकेत नवा ट्विस्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचे दोन भाग खूपच गाजले. तसेच या तिसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या भागात गोपाळचं कारस्थान उघडकीस येणार असल्याचं प्रोमोमधून दिसून आलं आहे.
या मालिकेच्या आगामी प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की गोपाळने आर्याच्या खूनाचा कट रचला आहे आणि तो तिचा मृतदेह घेऊन निघतो आहे. प्रोमोमध्ये दाखवलं आहे की गावातले लोक नरकी हडळ उत्सवात गायब झालेल्या आर्याचा शोध घेत आहेत, पण तिथे काहीही मिळत नाही. नंतर अचानक गोपाळ आर्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढताना दिसतो. तो स्वतःशी म्हणतो, “आधी या बॉडीची विल्हेवाट लावायला पाहिजे.”
त्यानंतर गोपाळ हा मृतदेह एका गाडीत ठेवतो आणि निघण्याचा प्रयत्न करतो. या वेळी, इन्स्पेक्टर जामकर त्याची गाडी थांबवतो आणि गोपाळला विचारतो की गाडीत काय आहे. जामकरला संशय वाटत असून तो स्वतः गाडीत काय आहे ते पाहण्याचा आग्रह धरतो. प्रोमोमध्ये जामकर गाडीकडे येताना दिसतो, त्यामुळे तो खरोखरच गोपाळला आर्याच्या मृतदेहासह पकडेल की नाही याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
झी मराठी वाहिनीने हा प्रोमो शेअर करताना कॅप्शन दिलं आहे, “आर्याचा खून गोपाळच्या अंगाशी येणार का?” या मालिकेत आर्या ही पात्र इन्स्पेक्टर जामकरची बहीण आहे आणि दोघांमध्ये खूप छान नातं आहे. जामकरला अद्याप आपल्या बहिणीच्या मृत्यूबद्दल सर्व सत्य माहिती नाही, त्यामुळे पुढे कथेत काय घडणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.