ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन Saam Tv
मनोरंजन बातम्या

ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसेन यांचे निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते Actor युसूफ हुसेन यांचे निधन झाले आहे. बॉलीवूड आणि टीव्हीचा सुप्रसिद्ध चेहरा असलेल्या युसूफ हुसैन यांच्या निधनाची माहिती देत दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. निर्माता आणि अभिनेते युसूफ हुसैन यांच्या निधनामुळे हंसल मेहता हादरून गेले आहेत. जड अंत: करणाने ही दुःखद माहिती देत असताना त्यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे की, मी आज खऱ्या अर्थाने अनाथ झालो आहे.

हे देखील पहा-

आता माझे आयुष्य अगोदर सारखे राहणार नाही. रात्री उशिरा ३ वाजून ३० मिनिटांनी त्यांनी हे ट्विट केले आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्यांच्या पोस्ट बरोबर युसूफ हुसैन यांचा फोटो शेअर करत लिहिले आहे, की 'मी शाहिदचे २ शेड्युल पूर्ण केले होते आणि आम्ही अडचणीत होतो. मी खूप अडचणीत होतो. माझी फिल्ममेकर म्हणून कारकीर्द संपणार होती. तेवढ्यातच ते आले आणि मला सांगितले की माझ्याकडे फिक्स डिपॉझिट आहे. जर ते पैसे तुमच्या अडचणी मध्ये कामी आले नाही, तर मलाही त्याचा काहीच उपयोग नाही.

युसूफ हुसैन यांना आठवत त्यांनी पुढे लिहिले की, त्यांनी चेकवर सही केली आणि शाहिद पूर्ण झाला, असे होते. युसूफ हुसेन, हंसल मेहता यांनी पुढे लिहिले आहे की- ते केवळ माझे सासरेच नाही. तर ते मला माझ्या वडिलांसारखे होते. जर आयुष्य एका शरीराच्या रूपात जिवंत असते. तर कदाचित त्यांच्यासारखे असते. आज ते निघून गेले. जेणेकरून स्वर्गात सर्व मुलींना 'जगातील सर्वात सुंदर मुलगी' आणि प्रत्येक पुरुषाला 'सर्वात सुंदर तरुण' म्हणता येईल. आणि शेवटी फक्त 'लव्ह यू लव्ह यू लव्ह यू' इतकंच सांगता येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

SCROLL FOR NEXT