
नव्वदच्या दशकात मुंबईतील गँगस्टर टोळी संपवण्यात दया नायक यांची भूमिका महत्वाची होती. दया नायक यांच्या नावावर 86 एन्काउंटर आहेत.
इंधन दरवाढ, पशुखाद्याचे वाढते दर आणि दूध उत्पादनात घट अशा संकटग्रस्त परिस्थितीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गाय दूधाच्या खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला.
अलीकडेच रस्ता आणि रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून पूर्व उपनगरातील पवई आय आय टी जंक्शन जवळील गांधीनगर दिशेने जाणारा सेवा मार्ग आता अपघाताचा साफळा बनला असून, येथील असमतोल रस्त्यामुळे दिवसागणिक दुचाकी अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात १६ चितळ जातीच्या हरणांचा मृत्यू लाळ खुरकूत या विषाणूजन्य आजारामुळे झाल्याचे समोर
हरणांना दिलेला खुराक चांगला होता की नाही यावरून प्रश्न उपस्थित
त्यामुळे यात आता कर्मचाऱ्यांपेक्षा अधिकाऱ्यांवरच कारवाईची शक्यता वाढली
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालाचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्यानं गृह विभागाकडून खबरदारी.
१७ वर्षानंतर आज सुनावण्यात आला मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल
पुराव्याअभावी सर्व आरोपींची करण्यात आली निर्दोष मुक्तता
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाच्या टीम बीडमधून रवाना झाल्या आहेत. गोट्या गित्ते हा मकोकातील आरोपी असुन त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता तपासाला वेग आल्याचं दिसत आहे. संशयित आरोपी असलेल्या गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकं रवाना झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड यांनी दिली आहे.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथे देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी गोशाळा स्थापन करण्यात आली आहे. कै. यशवंतराव राणोजी सौंदडे आणि कै. सखुबाई सौंदडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रावसाहेब सौंदडे यांनी श्री मार्तंड भैरव खंडेरायाच्या त्रिकाळ पूजेच्या दुग्धाभिषेकासाठी दोन गाई आणि एक वासरू असे गोधन अर्पण केले.
पवनचक्कीच्या कामासाठी गावच्या बाजूचा डांबरी रस्ता वाहतुकीस वापरायचा असेल तर पैसे द्या म्हणत बेदम मारहाण केली. पवनचक्कीच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण, पाच कर्मचारी गंभीर जखमी.
हिंगोलीत बाजार पेठेत चाकूहल्ला झाला
तरुणाला ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला
पण तरुणाचा जीव थोडक्यात बचावला
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकर चरणी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे नतमस्तक
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी श्री क्षेत्र भिमाशंकरला भेट देऊन दर्शन घेतलं. शिवलिंगावर दुग्धाभिषेक करत त्यांनी भक्तिभावाने पूजा अर्चा केली. यावेळी त्यांनी श्रावण यात्रेतही सहभाग घेतला.
धाराशिव जिल्ह्यातील महिला रुग्णालयात साप शिरला
रुग्णालयात कोब्रा,मणियार जातीच्या सापाचा वावर,व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
जिल्यातील एकमेव महिला रुग्णालय प्रस्तुतीसाठी शेकडो महिला रुग्णालयात उपचारासाठी केल्या जातात दाखल
जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने पाण्याचा विसर्ग करण्यात केले. सुरुवातीला धरणाचे १८ त्यानंतर १० नंबरचे गेट उघडण्यात आले.
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
नांदेडच्या गोवर्धन घाट पुलावरून महाविद्यालयीन तरुणाने घेतली उडी
जीवन रक्षक दलाच्या जवानांनी धाव घेत वाचवला तरुणाचा जीव
आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट; पोलिस तपास सुरु
अवघ्या महिनाभरात चौघांना जीवनदान देण्यात यश
जीव धोक्यात घालून जीवरक्षकांनी पुन्हा एकदा दाखवली माणुसकी
सोलापुरात भांडी वाटप ठेकेदाराचा ठेका रद्द करावा या मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
बांधकाम कामगारांकडून भांडी वाटप करत असताना हजार ते दीड हजार रुपये घेतल्याची कामगारांची तक्रार
अक्कलकोट विभागाचे भांडे वाटप ठेकेदाराचा ठेका रद्द करावा या मागणीसाठी बांधकाम कामगारांनी अधिकाऱ्यांसमोर आत्मदहण्याचा केला प्रयत्न
बांधकाम कामगार आत्मदहन करत असताना पोलिसांनी तत्परता दाखवल्यामुळे अनर्थ टळला
बांधकाम कामगारांना पैसे घेऊन भांडे वाटप करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची कामगारांची मागणी..
जायकवाडी धरणावर पोहोचले ऊस उत्पादक शेतकरी
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यक्रमाच्या वेळी शेतकऱ्यांची घोषणाबाजी
पैठणचा कारखाना उसाची बिले देत नसल्याचे निषेधार्थ आंदोलन
- भाजप नेते किरीट सोमय्या नाशिकमध्ये दाखल
- नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची घेतली भेट
- पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात बैठक सुरू
- भोंगे मुक्त नाशिक संदर्भात पोलिस आयुक्तांची सोमय्या यांनी घेतली भेट
बीडच्या वडवणी शहरात मंत्री इंद्रनील नाईक यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. यावेळी शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत आणि क्रेनच्या माध्यमातून फुलाचा भव्य पुष्पहार घालत स्वागत करण्यात आले आहे. तर यावेळी मंत्री नाईक यांची अण्णाभाऊ साठे चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे शहरात भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैनिकांचे रक्त सांडले त्या जवानांच्या प्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सातारा आणि सांगली जिल्ह्यातील एक हजार पैलवान आणि आजी-माजी सैनिक 9 ऑगस्टला क्रांती दिनादिवशी रक्तदान करणार आहेत. वर्षभर सिंदूर महारक्तदान यात्रा राबवण्यात येणार असून 9 ऑगस्टला कमांडो हॉस्पिटल जम्मू-काश्मीर येथे या यात्रेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती हिंदकेसरी पैलवान संतोष आबा वेताळ यांनी दिली.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलणार? सूत्रांची माहिती
पैठण : जायकवाडीच्या नाथसागरात जलपूजन; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन; धरणातील पाण्याचा साठा ९१ टक्क्यांवर; १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून ९ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करणार
बदलापूर रेल्वे स्थानकात बसवले जुनेच सरकते जिने
मविआकडून जुन्या सरकत्या जिन्यांची पोलखोल
MRVCकडून रेल्वे प्रवाशांची घोर फसवणूक
रोहिणी खडसे कोर्ट रूम मध्ये दाखल झाल्या आहेत
प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे पाटील काही उपस्थित
पुण्यातील ड्रग्स पार्टी प्रकरण
प्रांजल खेवलकर यांची पोलिस कोठडी आज संपणार
खेवलकर यांना पुणे न्यायालयात हजर केलं जाणार
खेवलकर यांना आज न्यायालयीन कोठडी होण्याची शक्यता
खेवलकर यांच्यासह इतर ५ आरोपींना सुद्धा आज न्यायालयात हजर केलं जाणार
खेवलकर यांच्यासह निखिल पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे आणि श्रीपाद यादव यांना ३१ तारखेपर्यंत सुनावली होती न्यायालयाने पोलिस कोठडी
रोहिणी खडसे कोट घालून कोर्टामध्ये दाखल
- भीक मागत समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना ही चिल्लर देण्याचा ईशारा
- दरम्यान पोलिसाकडून भीक मागितलेली रक्कम अधिकाऱ्यांकडे घेऊन जाण्यास मज्जाव
- यावेळी प्रहारचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले
- समाज कल्याण विभागातील काही लोकांनी एजंट नेमले असून त्यांच्यामार्फत 40 ते 70 हजार रुपये व्हॅलिडिटीसाठी मागितले जातात, त्याची कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे
- एसईबीसी, ओबीसी, एसटी आदी दाखल्यांसाठी हे पैसे मागितले जातात
- त्यामुळे आम्ही आज भीक मागून हे पैसे जमा केलेत, त्यांना विनंती करणार की हे पैसे घ्या पण सर्टिफिकेट द्या अशी मागणी करणार आहे.
लातूरच्या औसा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय रुग्णवाहिकेला, रुग्णालया बाहेरच भीषण आग लागली आहे.. अचानक आग लागल्याने संपूर्ण रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. रुग्णालया बाहेरच आग लागल्याने परिसरात भीतच वातावरण निर्माण झालं होतं, मात्र अग्निशमन दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
नांदेड रेल्वे स्थानक परिसरातून एका तरुणीचे अपहरण करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी धिंड काढली. काल (बुधवारी) दोन तरुणांनी एका तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नांदेड पोलिसांनी तातडीने कारवाई करत अपहरण झालेल्या तरुणीची सुखरूप सुटका केली.पोलीसांनी आरोपीला अटक केली. आज पोलिसांनी या आरोपीची त्याच रेल्वे स्थानक परिसरातून धिंड काढली.दरम्यान पोलिसांच्या या कारवाईमुळे आरोपीची दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून ठाकूर यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रेल्वेमध्ये बॉम्बब्लास्ट करणारे सगळे निर्दोष, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सगळे निर्दोष तर सरकार करत तरी काय आरोपींची बाजू घेऊन सरकार गोंधळ घालतं का ? सत्तेतील लोकांसोबत आरोपी होतेच त्यामुळे सत्तेत आल्यानंतर ज्यांनी चुकीचे वर्तन केले, त्यांनी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला त्यांना सोडून दिलं जात आहे. या देशामध्ये बरंच चुकीचं घडत आहे असेही ठाकूर म्हणाल्या.
पिक विमा भरण्याची आज शेवटची तारीख...
पिक विमा भरण्यासाठी तारीख वाढवावी शेतकऱ्यांची मागणी...
बीड जिल्ह्यात माजलगाव व आष्टी तालुक्यात घरफोडी सव्वाचार लाखाचा ऐवज लांब पास...
पिकप ची बसला धडक 45 प्रवासी बाल बाल वाचले; बीडच्या मांजरसुंबा घाटातील प्रकार...
बीडच्या महाजन वाडीत विद्युत मोटार चोरी तक्रार घेण्यास नेकनूर पोलिसांची टाळाटाळ...
नवी मुंबई शहरातील गरजेपोटी घरांचा प्रश्न निर्माण झालाय प्रकल्पग्रस्तांची फसवणूक सरकारकडून केली जात आहे तसेच सिडकोणी 26हजार घरांची लॉटरी काढली मात्र त्या घरांचे किंमत भरमसाठ असल्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे शक्य नाहीये याच मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्याचं काम शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोवर मोर्चाचं नियोजन करण्यात आलं आहे.
जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी तडकाफडकी दिला राजीनामा
मला विश्वासात न घेता जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणूक झाल्या आहेत.
त्यासोबतच तालुक्यातील तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांच्या ही नेमणूक विश्वासात नघेता करण्यात आल्या आहेत.
पक्ष श्रेष्टचा विश्वास नसल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे शिवाजी सावंत यांनी पत्र लिहून स्पष्टीकरण दिले आहे.
माजी मंत्री तानाजी सावंत यांचे मोठे बंधू आणि सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत शिवाजी सावंत
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.. काँग्रेसचे नेते डॉ. अभय पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत सोडचिट्टी दिलीय.. अर्थातच त्यांनी राजकीय सन्यास घेतलाये.. त्यांच्या निर्णयाने अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का म्हणता येईल.. दरम्यान, काँग्रेसमध्ये सदस्यांची नवीन कार्यकारणी जाहीर झाली, आपल्याला विश्वासात न घेता, कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे., त्यातूनच ते काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्याचे बोलले जाते. मात्र, पक्षाला वेळ देऊ शकत नसल्याचे कारण समोर ठेवत त्यांनी राजकरणातून सन्यास घेतल्याचे अभय पाटील म्हटले..
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उर्वरित सहा जागांचे निकाल आज घोषित झाले. या सहाही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आलेत. दोन दिवसापूर्वी १५ जागांचा निकाल घोषित झाला होता. त्यात महायुतीचा ११ जागांवर विजय झाला होता. तर, काँग्रेसला केवळ ४ जागा जिंकता आल्या होत्या. न्यायालयीन प्रक्रियेमुळं थांबलेल्या ६ जागांचे निकाल आज घोषित करण्यात आलेत. यात सर्व सहाही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेत. विशेष म्हणजे, आज निकाल घोषित झालेल्या विजय उमेदवारांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री तथा भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांचाही मोठ्या मताधिक्यानं विजय झाला.
Amravati: माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा रोहित पटेल रात्री पासून पोलिसांच्या ताब्यात
चिखलदरा पोलीस स्टेशन मध्ये माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा रोहित पटेल रात्री पासुन पोलिसांच्या ताब्यात....
काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा चिखलदरा पोलीस स्टेशन मध्ये गेल्या दोन तासा पासून ठिय्या आंदोलन सुरु
भाजपा आमदार केवलराम काळे यांच्या नागापूर आश्रमा शाळा मध्ये पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू झाला होता व तीन विद्यार्थीनी यात गंभीर जखमी झाल्या होत्या...
भाजपा आमदार केवलराम काळे यांच्या शाळेत ही घटना घडल्यानंतर शाळा व संस्था प्रशासनावर कारवाईच्या मागणीसाठी माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा रोहित पटेल यांनी केला होता आंदोलन
अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ यांनी मिरवणुकीची वेळ बदलली
मंडई मंडळ आणि भाऊसाहेब रंगारी मंडळ दुपारीच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार
मानाचे गणपती मार्गस्थ होताच दोन्ही मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय
६ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक पार पडणार
७ सप्टेंबर रोजी असलेल्या खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे दोन्ही मंडळांचा निर्णय
मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर मालेगावात हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष केला जातोय. एकमेकांना पेढे भरून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत.
पश्चिम रेल्वेच्या वानगाव रेल्वे पुला शेजारी तयार करण्यात आलेल्या सर्विस रोडची अवघ्या दोन महिन्यातच चाळण . कोट्यावधी रुपयांच्या घरात निधी खर्च करून तयार केलेला सर्विस रोड दोन महिन्यातच उखडला .ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा स्थानिकांचा आरोप . रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी चिकट माती आणि भल्या मोठ्या दगडांचा वापर . अपघात घडण्याची शक्यता . सार्वजनिक बांधकाम विभागाच दुर्लक्ष
अँकर :- सांगलीच्या कृष्णा नदी च्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे. कृष्णेची पातळी ही 22 फुटावर येऊन पोहोचली आहे. दोन दिवसापूर्वी 25 फुटावर असणारी कृष्णेची पातळी आता 22 फुटावर आली आहे. त्यामुळे सांगलीकराना दिलासा मिळाला आहे. मात्र प्रशासन कडून खबरदारी म्हणून सतर्क राहण्याचे आवाहन नदी काठच्या लोकांना दिले आहे. मात्र सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे. त्याच बरोबर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ही पावसाची उघडझाप सुरू असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे. मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर अजित पवार देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.
मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. महत्त्वाचे पुरावे नाहीत आणि पंचनामा व्यवस्थित झाला नाही, यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणातील सर्व आरोपी कोर्टात दाखल झाले आहेत. वकीलदेखील हजर झाले आहे. थोड्याच वेळात निकाल जाहीर होणार आहे.
- थोड्याच वेळात मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकाल वाचनाला सुरुवात होणार असल्याने पोलिसांकडून खबरदारी
- भिकू चौकात गर्दी होऊ नये यासाठी जमावाला पांगवण्यास सुरुवात
- अहिल्या मंदीर धंतोली,नागपूर येथे दुःखद निधन झाले.
- प्रमिलाई ह्या मागील तीन महिने आजारी होत्या. तेच पंधरा दिवसांपासून प्रकृती अधिकच बिघडत गेली....
- 1978 -2003 या 25 वर्षाचा प्रदीर्घ कालखंडात राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय प्रमुख कार्यवाहिका राहिल्या आहेय...
- आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला...उद्या त्यांच्यावर सकाळी 8 वाजता अंतिम संस्कार होईल.
- राष्ट्रसेविका समितीच्या संचालिका म्हणून अनेक वर्ष काम केला...
पुणे -
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज पुणे दौऱ्यावर
कोकाटे यांच्या पुण्यातील निवासस्थानाच्या बाहेर चोख सुरक्षा
कृषी विद्यापीठातील बंगल्याबाहेर मोठा बंदोबसत
कोकाटे यांच्या उपस्थितीत आज पुण्यात कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे
कार्यशाळेला सुद्धा माध्यमांना परवानगी नाही
2008 साली मालेगावच्या बॉम्बस्फोट खटल्याचा आज फैसला होणार आहे.या खटल्यात तपास तत्कालीन एटीएस अधिकारी स्वर्गीय हेमंत करकरे यांनी तपास करित भाजप नेत्या प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह सात हिंदुत्ववादी नेत्यावर दोषारोप दाखल केल्याने प्रथम देशात भगवा दहशतवाद पुढे आला होता.त्यामुळे मालेगावकर नागरिकांनी त्यांच्या नावाने एका चौकाला शहीद हेमंत करकरे असे नाव दिले आहे.त्यांनी योग्य दिशेने तपास केला त्यामुळे कुठंतरी पीडितांना न्याय मिळेल आणि देशातील भाईचारा कायम राहील अशी आशावाद बॉम्बस्फोटानंतर मालेगावात शांतता राखण्यासाठी प्रयत्न करणारे तसेच संपूर्ण निकला साठी कागदपत्र पुरवणारे मौलाना अब्दुल कय्युम कासमी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बीडच्या केज तालुक्यातील लिंबाचीवाडी येथील मुख्य रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दूरावस्था आहे. या रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी, आजारी असलेले रूग्न आणि इतर सर्व वाहतूक होते. या रस्त्यासाठी गतवर्षी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मात्र अद्याप पर्यंत काम झालेले नाही. दोन शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्याने काहीच काम झाले नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पुढील आठ दिवसात रस्त्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास रस्ता रोको आंदोलन आणि आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनातून गावकऱ्यांनी दिला आहे.
अकोला शहरात अज्ञात व्यक्तीने तीन दुचाकी जाळल्या आहेत. अकोल्यातल्या राजू गांधी नगरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून मध्यरात्रीच्या सुमारास या दुचाकींना पेटवून देत जाळन्यात आल्या.. या दुचाकी कुणी आणि का? जाळल्या हे कळू शकले नाहीए. या प्रकरणात सिव्हिल पोलिस स्टेशन येथे तक्रार देण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.. मध्यरात्रीच्यानंतर घराबाहेर ठेवलेल्या तीनही दुचाकिंमवर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा हा प्रकार होता.
पुणे -
राज्यातील पाऊस झाला कमी
केवळ विदर्भाला येलो अलर्ट
राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आता कमी झाला आहे
केवळ विदर्भातील काही जिल्ह्यात मात्र मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे -
वाहनांची जाळपोळ, तोडफोड करणारे आता थेट तुरुंगात
प्रकार रोखण्यासाठी पोलिसांचा निर्णय, दीड वर्षात 140 घटना
शहरात वाहनांची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना वाढीस लागल्या असून गेल्या दीड वर्षात शहरात 140 पेक्षा अधिक घटना घडल्या असून
त्यामध्ये 142 जणांना अटक करण्यात आली या प्रकारांमध्ये अल्पवयीनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे
कोल्हापूर -
नांदणीमधील महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरु.
लोकप्रतिनिधीनी सुरु केली सह्याची मोहीम..
तर कोणी संसदेत प्रश्न मांडण्यासाठी पुढे सरसावले .
एक स्वाक्षरी महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सह्याची मोहीम सुरु
महादेवी हत्तीनीला प्रशासनाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गुजरात मधील वनतारा पथकाला सुपूर्द केल्यानंतर कोल्हापूरकर आक्रमक
अनेक लोकप्रतिनिधी महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी पुढे सरसवले.
अमरावती -
अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विर्शी गावातील धक्कादायक घटना
गावातील जागेच्या वादातुन एका महिलेला तीन इसमाने व एका महिलेने केली जबर मारहाण
मारहाण करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्ती
मावळते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे सेवानिवृत्त झाले.
पुणे -
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी
सध्या 7000 क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू
गेल्या सहा ते सात दिवसापासून पुण्यातील भावा भिडे पूल पाण्याखाली होता
त्याचबरोबर नदीपात्रातील रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते
मात्र विसर्ग कमी केल्याने बाबा भिडे पूलाच्या खालून पाणी वाहत आहे
नदीपात्रातील रस्ता देखील वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय
मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा आज सकाळी ९०.९८ टक्के इतका झालाय.
त्यामुळे आज दुपारी ३ वाजता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून ९ हजार ४३२ क्युसेक्ने पाणी सोडले जाणार आहे.
त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
आज दुपारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जायकवाडी धरणात जल पूजन करण्यात येणार आहे.
गोदावरी नदी पात्रातून जायकवाडी धरणामध्ये सध्या १६ हजार १२३ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे.
नागपूर -
- बोगस शिक्षक आयडी घोटाळा प्रकरणात अडकलेल्या 632 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वन-टू-वन सुनावणीची प्रक्रिया लवकरच होणार सुरू
- आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या वैद्यते संदर्भात शिक्षण उपसंचालक घेणार अंतिम निर्णय
- शिक्षण आयुक्तांनी 29 जुलैला उपसंचालकांना सुनावणीचे आदेश दिले आहेत..
- या आदेशानंतर शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करून नियुक्ती बोगस की वैद्य हे स्पष्ट होणार
- त्यामुळे या बोगस कागदपत्रामुळे नियुक्ती घेणाऱ्याचे धाबे दणाणले आहे...
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणाचा आज निकाल
१७ वर्षांनंतर लागणार निकाल
निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
मालेगानमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेला बॉम्बस्फोट
पुणे -
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा दर्जा सुधारला
भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ गुणवत्ता सेवा परिषद यांच्या सर्वेक्षणातून माहिती
एप्रिल ते जून या तीन महिन्यातील सर्वेक्षणातून विमानतळावरील सेवेच्या गुणवत्तेत वाढ
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात ५९ स्थानी असलेले पुणे विमानतळ आता ५७ व्या स्थानावर
विमानतळावरील स्वच्छतागृहांची परिस्थिती, खान पान सुविधा, विमानसेवा, सुरक्षितता, तक्रारीचे निराकरण करण्यासाठी लागणारा कालावधी या बाबींवर केले जात सर्वेक्षण
पुणे -
पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि तीन नगरपंचायती यांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार
नगरपरिषदांचा आराखडा नगर विकास विभागाकडे तर नगरपंचायती यांचा आराखडा विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे पाठवला
या दोन्हींवर आता 21 ऑगस्ट पर्यंत हरकती आणि सूचना नोंदविता येणार
जिल्ह्यातील बारामती आणि फुरसुंगी या दोन नगरपरिषदांमध्ये 41 आणि 32 इतकी सर्वाधिक सदस्य संख्या
राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि नगरपंचायती यांच्या प्रभागाच्या प्रारूप रचना तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.