Thursday Horoscope : आयुष्याच्या वळणावर आव्हाने स्वीकारावे लागणार; 'या' राशींच्या लोकांना जवळच्याच व्यक्तींकडून विरोध होईल

Thursday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना नवीन आव्हाने स्वीकारावे लागणार आहे. तर काहींना जवळच्या व्यक्तींकडून विरोध होणार आहे.
horoscope in marathi
horoscope Saam tv
Published On

गुरुवार,३१ जुलै २०२५,श्रावण शुक्लपक्ष,सीतला सप्तमी.

तिथी-सप्तमी २८|५९

रास- कन्या ११|१५ नं. तुला

नक्षत्र-चित्रा

योग-साध्य

करण-गरज

दिनविशेष-शुभ दिवस

मेष - आयुष्याच्या वळणावरती कितीही काटे असले तरी तुम्ही तग धरून उभे असता. आज अनेक आव्हाने स्वीकारावी लागतील. जवळच्याच व्यक्तींच्याकडून विरोध होईल. पण लवकरच तो मावळून पण पडेल.

वृषभ - आपण जसे असतो तसे जग नसते हे तुम्हाला चांगले समजून आले आहे. आपल्या मधील रसिकता याला दाद देणारी समोरची व्यक्ती असावी असे नेहमीच वाटते. प्रेमाच्या बाबतीत थोडीशी उजवी बाजू आज आहे. कलात्मक गोष्टींना सामोरे जाल.

मिथुन - वय मोठे झाले तरी अल्लडपणा टिकवून ठेवणारी आपली रास आहे. घरामधील सर्व जबाबदाऱ्या अगदी हसत खेळत आणि लिलया आज पार पडणार आहात. एकूण सर्व सुखाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

horoscope in marathi
Vastu Tips: घरात काच फुटणे शुभ असते की अशुभ?

कर्क- आपण करत असणाऱ्या गोष्टी नेहमीच चांगल्या असतात. पण केलेल्या गोष्टींना शाबासकीची थाप मिळाली तर दुप्पट उमेदीने आपण काम करता. आज असाच दिवस आहे जवळचे लोक तुम्हाला प्रगतीपथासाठी मदत करतील.

सिंह - "आवळा देऊन कोवळा" काढण्याची आपली कधीच पद्धत नाही. जे असेल ते दाम दुपटीने तुम्ही कराल. सचोटीने व्यवहार करायला आपल्याला आवडते. कुटुंबीयांच्या मदतीने आज महत्त्वाचे व्यवहार पार पाडाल.

कन्या - विनाकारण संशय आणि काही वेळेला खुसपट काढणारी आपली रास आहे. पण आज या सगळ्यांवर अंकुश ठेवून पुढे जाल. इतरांना काय वाटते यापेक्षा तुम्हाला काय करायचे आहे इकडे आज तुमचे अधिक लक्ष असेल. दिवस चांगला आहे.

horoscope in marathi
Kitchen Vastu Tips: स्वयंपाकघरात पाण्याची भांडी कोणत्या दिशेला ठेवावीत?

तूळ - कधी कधी "इकडे आड तिकडे विहीर" अशी आपली अवस्था होते. नक्की कोणता निर्णय घेऊ आणि कुठे न्याय देऊ हे कळत नाही. आज अनेक गोष्टींमधून अडचणी उद्भवल्यामुळे निर्णय क्षमता खालावेल. मनस्थिती सांभाळा.

वृश्चिक - कोणाच्या शक्यतो अध्यात मध्यात न येणारी आपली रास आहे. मात्र वेळेला आणि मैत्रीला जोड आणि सडेतोड अशी आपली खासियत आहे. जवळच्या लोकांबरोबर आज आनंदाचे क्षण वाटाल.

धनु - अग्नीतत्वाची आपली रास आहे. काही गोष्टींमध्ये रागावण्याची गरज नसते अशावेळी काही वेळेला आपल्याला अतिशय राग येतो. आज याच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी हे अडचणीचे ठरेल .

horoscope in marathi
Wednesday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; प्रेमात वाद होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

मकर - जरी ठरवले तरी गोष्टी घडत नाहीत आणि आपली रास चिवटपणा सोडत नाही. यशाचा ध्यास घेतलेली आपली मानसिक बैठक आजही यशाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. भाग्यकारक घटना घडतील.

कुंभ- सातत्याने नाविन्याच्या शोधात, नवनवीन आव्हाने स्वीकारायला आपल्यालाही आवडते.एकटेपणाने काम करणे हे सुद्धा आपली खासियत आहे. पण आज मात्र सर्वच व्यवहार जपून करावेत नाहीतर आगीतून फुफाट्यात अशी अवस्था नको.

मीन - प्रेमामध्ये पराक्रम गाठाल. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आवडीसाठी मोठे आव्हाने पेलायला आज तयार रहा. कामाशी निगडित सुद्धा सुवर्ता आल्यामुळे जगण्याची आणि काम करण्याची उमेद वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com