Raksha Bandhan: रक्षाबंधनपासून 3 राशींची होणार चांदीच चांदी; शनी-मंगळ बनवणार पॉवरफुल योग

Raksha Bandhan 2025 horoscope: रक्षाबंधन ९ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. हा दिवस केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याची गाठ मजबूत करणारा नाही, तर ग्रहांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी शनि आणि मंगळ हे दोन महत्त्वपूर्ण ग्रह एका विशिष्ट आणि शुभ स्थितीत येणार आहेत
Raksha Bandhan
Raksha Bandhansaam tv
Published On

राखी म्हणजे रक्षाबंधन हा सण स्नेह, प्रेम, विश्वास आणि सुरक्षेचं प्रतीक मानला जातो. यंदा रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या खास दिवशी अनेक शुभ योग तयार होणार आहेत, त्यातील एक विशेष योग म्हणजे नवपंचम राजयोग. हा योग शनि आणि मंगळ यांच्या संयोगामुळे तयार होणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा फारच मंद गतीने चालणारा ग्रह आहे. यावेळी शनी एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. शनीची साडेसाती, महादशा चालू असल्यास अनेक अडथळे आणि संकटांना सामोरं जावं लागतं. मात्र कुंडलीत शनि अनुकूल असेल तर ती व्यक्तीला चांगले फायदे मिळतात.

सध्या शनि मीन राशीत वक्री अवस्थेत आहे. अशा स्थितीत तो इतर ग्रहांसोबत युती करत असतो. ज्यामुळे नवनवीन शुभ-अशुभ योग तयार होतात. यावर्षी 9 ऑगस्ट रोजी मंगळ आणि शनि एकत्र येऊन नवपंचम राजयोग बनवणार आहेत. ज्याचा तीन राशींना विशेष फायदा होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

Raksha Bandhan
Jupiter Saturn Yuti effects: 12 वर्षांनी गुरु-शनि बनवणार दुर्लभ संयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार, पैसाही येणार हाती

मेष राशी

मेष राशीसाठी नवपंचम राजयोग अत्यंत अनुकूल ठरू शकणार आहे. शनी वक्री असल्याने त्याचा नकारात्मक प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी ही वेळ फायदेशीर ठरेल. घरात वातावरण चांगलं राहणार आहे. मनाची अस्वस्थता कमी होईल आणि शांतीची भावना निर्माण होईल.

मीन राशी

मीन राशीसाठीही हा राजयोग फार फलदायी ठरू शकणार आहे. सध्या या राशीत शनीची साडेसातीचा दुसरा टप्पा चालू आहे. या काळात तुम्हाला मेहनतीचं चांगलं फळ मिळणार आहे. निर्णय आता आत्मविश्वासाने घेऊ शकाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला मिळू शकणार आहे.

Raksha Bandhan
Angarak Yog: उद्यापासून 3 राशींच्या व्यक्तींना नशीबी येणार फक्त दुःख; मंगळ-केतूच्या युतीने बनणार अंगारक योग

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीसाठीही 9 ऑगस्ट रोजी तयार होणारा नवपंचम राजयोग फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांचे अनेक प्रश्न आणि अडचणी आता दूर होण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणींसोबतचे नातं अधिक घट्ट होणार आहे. तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवू शकाल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून मान्यता मिळणार आहे.

Raksha Bandhan
Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com