ladki bahin yojana : अपात्र महिला आणि बोगस भावांना दणका; अपात्र लाडक्यांकडून पैसे वसूल करणार, वाचा स्पेशल रिपोर्ट

ladki bahin yojana update : लाडकी बहिण योजनेतील अपात्र लाभार्थी आता सरकारच्या रडारवर आलेत. या योजनेत घुसखोरी केलेल्या बोगस भावांकडून पैसे वसूल करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. पाहूया एक रिपोर्ट...
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv News
Published On

लाडकी बहीण योजना डोईजड झाल्यावर सरकार खडबडून जाग झालंय. योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्यावर आता अपात्र असूनही लाभ घेणाऱ्यांकडे प्रशासनाने मोर्चा वळवला आहे. गेल्या काही महिन्यातल्या काटेकोर छाननी नंतर निकषात न बसलेले लाखो लाभार्थी अपात्र ठरले आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माहितीनुसार, २६ लाख ३४ हजार लाभार्थी अपात्र असतानाही त्यांनी लाभ घेतला होता. आता जून महिन्यापासून त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे. तर तब्बल 14,298 पुरुषांनीही या योजनेत घुसखोरी करुन सरकारी पैशांवर डल्ला मारल्याचं उघड झालंय. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत बोगस लाभार्थ्यांकडून पैसे वसुल करण्याची सूचना केली आहे.

Ladki Bahin Yojana
Mahadev Jankar : भाजपसोबतची युती सर्वात मोठी चूक; महादेव जानकरांनी मनातलं सगळंच सांगितलं

अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू ठेवा. तसेच ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांची चौकशी करून पैसे वसूल करा, अशा सूचना केली आहे. विकलांग किंवा अन्य कारणांनी महिलांचे खाते नसेल आणि महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यावर जमा झाले का हेही तपासा. सरकारी कर्मचारी, विविध योजनांचे लाभार्थी आणि अन्य निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात यावा. तसेच त्यांची सातत्याने पडताळणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

Ladki Bahin Yojana
Tsunami Warning : रशिया, जपान ते अमेरिका भूकंपाने हादरलं; आता १२ देशांना त्सुनामीचा अलर्ट, भारताला किती धोका?

दरम्यान, लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. यासंदर्भात एसआयटी चौकशीची मागणी त्यांनी केलीय. वेगवेगळ्या विभागाकडून मिळालेल्या माहिती आधारे अर्जांची पडताळणी सुरु असल्याचं महिला आणि बालविकास खात्याने स्पष्ट केलंय.

Ladki Bahin Yojana
Maharashtra Politics : जुन्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? भाजपमधील इनकमिंगवरून माजी आमदाराने सांगितली मनातील सल

राज्यातील दोन कोटी 25 लाख पात्र लाभार्थ्यांना

जून महिन्याचा हप्ता वितरित केला आहे. मात्र या योजनेचा गैरफायदा घेत अनेकांनी सरकारची तिजोरी रिकामी केली आहे. त्यामुळे आगामी काळात अर्जांच्या काटेकोर पडताळणीनंतर ख-या गरजूंपर्यंतच लाभ पोचेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com