Vrushika Mehta And Saurabh Ghedia Wedding Photos Instagram
मनोरंजन बातम्या

Vrushika Mehta Wedding: 'दिल दोस्ती डान्स' फेम अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे, लग्नसोहळ्याचे खास फोटो पाहिलेत का?

Vrushika- Saurabh Wedding Photos: 'दिल दोस्ती डान्स' फेम वृषिका मेहता हिने बॉयफ्रेंड सौरभ घेडियासोबत लग्न केले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नातले काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Chetan Bodke

Vrushika Mehta And Saurabh Ghedia Wedding Photos

सध्या सर्वत्र लग्नघाई सुरु आहे. सर्व सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधत आहेत. नुकतंच बॉलिवूडची फेमस डान्सर मुक्ती मोहनने बॉयफ्रेंड कुणाल ठाकूरसोबत सप्तपदी घेत लग्नबंधनात अडकली. आता तिच्यानंतर आणखी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली. 'दिल दोस्ती डान्स' फेम वृषिका मेहता हिने बॉयफ्रेंड सौरभ घेडियासोबत लग्न केले आहे. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नातले काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. (Wedding)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वृषिका मेहताने १० डिसेंबर रोजी अर्थात रविवारी तिच्या सोशल मीडिया हँडलवर लग्नातले व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले आहे. तिने फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. “भवद्भिः सह सङ्गतिः आजीवनं तिष्ठतु... सर्वेषु कार्येषु सफलतां जनयतु। तुझी साथ मला आयुष्यभर मिळालेली आहे. दोघांनाही प्रत्येक प्रयत्नांमध्ये यश मिळो.” असं कॅप्शन देत तिने लग्नातला व्हिडीओ शेअर केला आहे. वृषिकाने गेल्या वर्षी अर्थात ११ डिसेंबर २०२२ रोजी बॉयफ्रेंड सौरभ घेडियासोबत अहमदाबादमध्ये साखरपुडा केला होता. ठिक एका वर्षानंतर वृषिका आणि सौरभने लग्न केले. (Actress)

वृषिका आणि सौरभच्या लग्नातील लूकबद्दल बोलायचे तर, वृषिकाने हेवी लाल रंगाचा लेहेंगा तर सौरभने राखाडी रंगाची शेरवानी परिधान केली होती. यावेळी दोघांच्याही कुटुंबीयांसह त्यांच्या मित्रमंडळींनीही उपस्थिती लावली होती. वृषिकाचा नवरा सौरभ घेडिया हा टोरंटोमध्ये राहतो. तो व्यवसायाने सेलिब्रिटी वैगेरे कोणीही नसून सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. या दोघांचीही ओळख एका कॉमन फ्रेंडच्या ओळखीने झाली. आणि नंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. (Social Media)

वृषिकाने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंवर फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. शांतनू माहेश्वरी, टीना दत्ता, नायरा बॅनर्जी, सुयश राय, किश्वर मर्चेंट यांनी कमेंट्सच्या माध्यमातून वृषिका- सौरभला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. वृषिका मेहताच्या कामाबद्दल बोलायचे तर, 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'दिल दोस्ती डान्स', 'ये है आशिकी', 'इश्कबाज' आणि 'ये तेरी गलियाँ' सारख्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hruta Durgule Husband: अभिनेत्री हृता दुर्गुळेचा नवरा कोण?

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गूढ वाढलं, पोलिसांनंतर आता खासदारासह पीएवर गंभीर आरोप; भावाचा खुलासा

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आशा वर्करवर ॲम्बुलन्स चालकाकडून लैंगिक छळ

Nashik Crime : संतापजनक; रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत गैरवर्तन, रात्री परतताना चालकाचे कृत्य

"RSS रजिस्टर आहे का?" सुजात आंबेडकरांचा थेट सवाल|VIDEO

SCROLL FOR NEXT