Ashish Kapoor Arrested SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashish Kapoor Arrested : मोठी बातमी! पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, वॉशरूममध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

Ashish Kapoor Arrest In Pune : टिव्हीचा प्रसिद्ध अभिनेता आशिष कपूरला पुण्यात अटक करण्यात आली आहे. वॉशरूममध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मनोरंजनसृष्टीतून मोठी बातमी समोर आली आहे.

प्रसिद्ध अभिनेता आशिष कपूरला पुण्यात अटक केली आहे.

वॉशरूममध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अभिनेत्यावर केला आहे.

मनोरंजनसृष्टीतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय टिव्ही अभिनेता आशिष कपूरला (Ashish Kapoor) बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. महिलेने आशिषने आपल्यावर बाथरूममध्ये अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

बलात्कार प्रकरणी आशिष कपूरला बुधवारी पुण्यात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने सुरुवातील दोन पुरूषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले. तसेच एका महिलेने शारीरिक छळ देखील केला. शेवटी महिलेने आशिष कपूरने तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. महिलेने आरोपात असेही म्हटले आहे की, बलात्काराचा व्हिडीओ शूट करण्यात आला. मात्र अद्याप पोलीसांना कोणताही व्हिडीओ सापडला नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, आशिष कपूर आणि त्या महिलेची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर ती महिला आशिष कपूरच्या एका मित्राच्या घरी पार्टीसाठी गेली. आशिषने तिला बोलावले होते. तेव्हा ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने 11 ऑगस्टला आशिष कपूर, त्याचा मित्र, मित्राची बायको, दोन इतर अनोळखी पुरुष यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल केले. त्यानंतर 18 ऑगस्टला महिलेने आशिष आणि त्याच्या मित्राने बलात्कार केल्याचे सांगितले. तसेच तिला मारहाण देखील केल्याचे म्हटले आहे.

रिपोर्टनुसार, पीडित महिला आणि आशिष कपूर पार्टी सुरू असताना बाथरूममध्ये गेले. ही पार्टी दिल्लीत एका मित्राच्या घरी होती. बाथरूममधून बराच वेळ झाला तरी ते न आल्यामुळे मित्र बाथरूमचा दरवाजा ठोठावू लागले. दरवाजा उघडल्यावर मित्रांमध्ये वाद झाले. तेव्हा मित्राच्या बायकोने पीडित महिलेला मारहाण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: टोकाचं भांडण! गरोदर बायकोला अमानुष मारहाण करत जागीच संपवलं, छतावरून उडी मारून नवरा फरार

Maharashtra Live News Update: विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले, गोदावरी नदीपत्रात पाणी सोडले

ड्रग्ज विकणाऱ्याला हटकलं, काँग्रेस नेत्यावर कोयत्याने सपासप वार, उल्हासनगर हादरले

Fact Check: मच्छरांची सरकारी फॅक्टरी; डेंग्यूवर इलाज करणारा मच्छर? व्हिडिओमागचं सत्य काय?

Canara Bank Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कॅनरा बँकेत ३५०० पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT