'बिग बॉस 19' शो 24 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
'बिग बॉस 19' मध्ये कुस्तीपटू अंडरटेकर झळकणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
बिग बॉसच्या घरात यंदा जोरदार राडा पाहायला मिळणार आहे.
सध्या सर्वत्र 'बिग बॉस 19' ची (Bigg Boss 19) चर्चा पाहायला मिळत आहे. शोमध्ये कोणते कलाकार दिसणार यावरून सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे. आता यात अजून एका नावाचा उल्लेख पाहायला मिळत आहे. हा कलाकार थेट परदेशातील आहे. जगातील प्रसिद्ध कुस्तीपटू अंडरटेकर (The Undertaker) 'बिग बॉस 19'मध्ये पाहायला मिळणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्याची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याचे बोले जात आहे.
'बिग बॉस 19' मधील अंडरटेकर यांच्या एन्ट्री बद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे. 'बिग बॉस' चे निर्माते आणि अंडरटेकर यांच्या टीमशी बोलत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. जर अंडरटेकर 'बिग बॉस 19' मध्ये झळकले तर शोची लोकप्रियतेत अधिकच भर पडेल. तसेच बिग बॉस परदेशातही तुफान गाजेल.
अंडरटेकर हे प्रसिद्ध अमेरिकन कुस्तीपटू आहेत. 30 वर्षांहून अधिक काळ त्यांची शानदार कारकीर्द राहिली आहे. WWE मध्ये अनेक विक्रम केले आहेत. जर अंडरटेकर हे 'बिग बॉस 19' दिसले तर शोमध्ये भरपूर ड्रामा आणि ॲक्शन पाहायला मिळणार आहे.
'बिग बॉस 19' हा शो उद्या (24 ऑगस्ट) पासून सुरू होत आहे. चाहते या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहेत. या शोचे होस्टिंग बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (salman khan) करणार आहे. 'बिग बॉस 19'ची यंदाची थीम राजकारणावर आधारित आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19'मध्ये गौरव खन्ना, पायल गेमिंग, हुनर हाली गांधी, बसीर अली, सिवेत तोमर, आवाज दरबार, नगमा मिराजकर, अशनूर कौर, झीशान कादरी, तान्या मित्तल, नेहल चुडासमा, अमल मलिक यांच्या नावांचा समावेश आहे.