Bajrang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर ४ वर्षांची बंदी; नेमकं काय आहे प्रकरण?

Bajrang Punia: स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियावर कडक कारवाई केलीये. NADA ने त्याच्यावर ४ वर्षांची बंदी घातली आहे.
Bajrang Punia
Bajrang Puniasaam tv
Published On

भारताचा स्टार रेस्टलर बजरंज पुनियावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये NADA (National Anti Doping Agency) ने भारतीय स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियावर कडक कारवाई केलीये. NADA ने त्याच्यावर ४ वर्षांची बंदी घातली आहे. बंदी घालण्याचे कारण म्हणजे अँटी डोपिंग कोडचं उल्लंघन केलं असल्याचं माहिती आहे.

Bajrang Punia
Arjun Tendulkar: मुंबई इंडियन्सने सचिनचा मान राखला; Unsold अर्जुन तेंडुलकरला अखेरच्या ५ मिनिटांत 'इतक्या' रुपयांत घेतलं संघात

या कारवाईमुळे बजरंग पुनियाचं करियर संपुष्टात आल्याचं म्हटलं जातंय. कारण या बंदीच्या काळात तो कोचिंग देखील देऊ शकणार नाहीये.

26 नोव्हेंबर रोजी NADA ने राष्ट्रीय टीमसाठी निवड चाचणी दरम्यान डोप चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिल्याने बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी घातली. यापूर्वी, NADA ने 23 एप्रिल रोजी या गुन्ह्यासाठी टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या कुस्तीपटूवर बंदी घातली होती. त्यानंतर जागतिक स्तरावरील कुस्ती संघटना UWW (युनायटेड वर्ल्ड रेसलिंग) कडून त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.

Bajrang Punia
Ajinkya Rahane: KKR ने 'या' तीन खेळाडूंची लाज वाचवली? अखेरच्या क्षणाला अजिंक्य रहाणेसोबत 'या' खेळाडूंना घेतलं ताफ्यात

बजरंगने केलं होतं अपील

बजरंगने या बंदीच्या विरोधात अपील देखील केलं होतं. यावेळी NADA ने आरोपांची नोटीस जारी करेपर्यंत NADA च्या अनुशासनात्मक डोपिंग पॅनेलने (ADDP) 31 मे रोजी ते रद्द केले होते. यानंतर NADA ने 23 जून रोजी कुस्तीपटूला नोटीस पाठवली.

बजरंग पुनियाने त्याची सहकारी कुस्तीपटू विनेश फोगटसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना या ठिकाणी अखिल भारतीय किसान काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली होती.

Bajrang Punia
Ajinkya Rahane: KKR ने 'या' तीन खेळाडूंची लाज वाचवली? अखेरच्या क्षणाला अजिंक्य रहाणेसोबत 'या' खेळाडूंना घेतलं ताफ्यात

त्या आंदोनलामुळे माझ्यावर बंदीची कारवाई- पुनिया

बजरंगने सुरुवातीपासूनच सांगितलेलं की, माजी WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील त्यांच्या सहभागामुळे डोपिंग नियंत्रणाच्या संदर्भात त्याला पक्षपाती वागणूक दिली जातेय.

Bajrang Punia
Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

बजरंगच्या म्हणण्यानुसार, त्याने नमुना देण्यास कधीही नकार दिला नाही. परंतु केवळ त्याच्या ईमेलवर NADA चा प्रतिसाद मागितला ज्यामध्ये त्याने डिसेंबर 2023 मध्ये त्याचे नमुने गोळा करण्यासाठी कालबाह्य किट का पाठवल्या गेल्या याची उत्तरे मागितली होती. नंतर NADA नेही यामागचं कारण स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com