ICC World Cup 2023 Opening Ceremony In Bollywood Celebrities Saam Tv
मनोरंजन बातम्या

ICC World Cup 2023 Opening Ceremony: ‘आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०२३’चं ओपनिंग सिरेमनी होणार दिमाखदार, बॉलिवूड सेलिब्रिटी दाखवणार जलवा

ICC World Cup 2023 News: येत्या ४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ओपनिंग सिरेमनीचं दिमाखदार उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Chetan Bodke

ICC World Cup 2023 Opening Ceremony

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०२३ ला येत्या ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या वर्ल्डकपमधील पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये रंगणार आहे. वर्ल्ड कप सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगारंग उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे . या सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह दिग्गज गायक हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे.

या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स हे संघ सहभागी होणार आहेत.

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०२३ च्या उद्घाटन सोहळ्याला गायक अरिजित सिंग, गायक शंकर महादेवन, गायिका श्रेया घोषाल, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री तमन्ना भाटिया देखील उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शान वाढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी हे सर्वच सेलिब्रिटी आपल्या खास अंदाजात उपस्थितांचे सर्वांचेच दमदार मनोरंजन करतील यामध्ये काही शंका नाही.

गायकांच्या दमदार आवाजाने आणि सेलिब्रिटींच्या जबरदस्त डान्स शैलीवर सर्वच उपस्थित ठुमके लगावणार हे मात्र नक्की. यावेळी सेलिब्रिटींच्या डान्स सोबतच लेझर शोचेही आयोजन करण्यात आले आहे. इव्हेंट दरम्यान, आतिषबाजीने आणि लेझर शोने प्रेक्षकांचे लक्ष वेधणार हे नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT