World Cup Records: पहिल्या वर्ल्डकप स्पर्धेत कोण होते टीम इंडियाचे कर्णधार? कोणी केल्या सर्वाधिक धावा?

World Cup 2023: कोण होते भारताचे पहिले कर्णधार?
who was team india's captain in first icc odi cricket world cup world cup records  news in marathi
who was team india's captain in first icc odi cricket world cup world cup records news in marathi Saam tv news
Published On

World Cup Records:

आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ भारतात दाखल झाले असून सर्व संघांनी सराव करायला सुरुवात केली आहे. यावेळी वर्ल्डकप स्पर्धेचा थरार भारतात रंगणार असल्याने भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

यावेळी रोहित शर्मा देखील भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसेल. आतापर्यंत केवळ कपिल देव आणि एमएस धोनी यांना वर्ल्डकप जिंकून देता आला आहे.

या दोन्ही कर्णधारांना कोणीच विसरू शकणार नाही. दरम्यान पहिल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताचे कर्णधार कोण होते हे तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या.

who was team india's captain in first icc odi cricket world cup world cup records  news in marathi
Asian Games 2023: गोल्फमध्ये आदितीची रौप्यक्रांती! गोल्डमेडल हुकलं मात्र सिल्व्हर मेडल जिंकत घडवला इतिहास

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिली वर्ल्डकप स्पर्धा १९७५ मध्ये खेळवली गेली होती. त्यावेळी एस वेंकटराघवन हे भारतीय संघाचा कर्णधार होते.

मुख्य बाब म्हणजे केवळ १ वनडे सामना खेळण्याच्या अनुभव असताना एस वेंकटराघवन यांना कर्णधारपद सोपवलं गेलं होतं. इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत भारताला ३ पैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला होता.

आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, पहिल्या वहिल्या वर्ल्डकप स्पर्धेत सुमार कामगिरी करूनही १९७९ मध्ये झालेल्या दुसऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत एस वेंकटराघवन हे भारताचे कर्णधार होते.

या स्पर्धेतील कामगिरी तर १९७६ वर्ल्डकप स्पर्धेपेक्षाही खराब होती. या स्पर्धेतील ३ सामन्यांपैकी एकाही सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला नव्हता.

who was team india's captain in first icc odi cricket world cup world cup records  news in marathi
Asian Games 2023: ना फुटबॉल, ना व्हॉलीबॉल! सेपक टकराव हा खेळ खेळतात तरी कसा? जाणून घ्या A to Z माहिती

दुसऱ्या वर्ल्डकप गमावले ३ सामने..

भारतीय संघाला १९८९ वर्ल्डकप स्पर्धेत ३ सामने खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. यादरम्यान वेस्टइंडीजकडून ९ विकेट्सने, न्यूझीलंडकडून ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता.

गावसकरांनी केल्या होत्या सर्वाधिक धावा..

भारतीय संघाचे माजी फलंदाज सुनील गावसकरांच्या नावे एका नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली होती. त्यांनी पहिल्याच वर्ल्डकप स्पर्धेत १७४ चेंडूंचा सामना करत ३६ धावांची खेळी केली होती. ही वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात संथ खेळी ठरली होती.

मात्र आश्चर्यचकित करणारी बाब अशी की, सुनील गावसकर हे १९७५ वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज होते. त्यांनी ३ सामन्यात ११३ धावा केल्या होत्या. (Latest sports updates)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com