Raj Anadkat image  Saam Tv
मनोरंजन बातम्या

'टप्पू'नेही सोडला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'? बऱ्याच दिवसांपासून शूटिंगला आलाच नाही

टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील व्यक्तिरेखा एकामागून एक शोमधून जात आहेत. शोमध्ये टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनाडकटनेही शो सोडणार आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: टीव्हीवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या(TMKOC) अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. दिशा वाकानी, नेहा मेहता, शैलेश लोढा यांच्यानंतर आता 'टप्पू'ची भूमिका साकारणारा राज अनडकट (Raj Anadkat) देखील या मालिकेतून 'एक्झिट' घेणार असल्याची चर्चा टीव्ही इंडस्ट्रीत सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज अनडकट या शोचे शूटिंग करत नाहीये. हा खुलासा शोमध्ये भिडेची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडकर याने केला असून, राज काही काळ सेटवर गैरहजर असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तो सेटवर येत नसल्याचे मंदार चांदवडकर म्हणाला.

मंदार चांदवडकर याने एका मुलाखतीत सांगितले की, 'एक कलाकार म्हणून त्याने शो सोडला आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही; परंतु तो काही दिवसांपूर्वी आजारी होता. ज्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून शूटिंग करत नव्हता. मी त्याला अजून सेटवर पाहिलेले नाही'. २०१७ साली शोमध्ये भव्य गांधींच्या जागी राज हा 'टप्पू'ची भूमिका साकारत आहे.

राज अनडकट सध्या त्याच्या आई आणि बहिणीसोबत दुबईत सुट्टी घालवत आहेत. तो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसाठी त्याच्या व्हेकेशनचे फोटो शेअर करत आहे. याचवेळी, राजने नुकतेच रणवीर सिंगसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. याच बरोबर त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की तो रणवीर सिंगसोबत लवकरच मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी शैलेश लोढा उर्फ ​​तारक मेहतानेही या शोचा निरोप घेतला. शैलेश लोढा 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा १४ वर्षे भाग होता. त्याने शो सोडल्यानंतर त्याविषयी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT