Video : WWE मध्येही पुष्पाचा फिवर; प्रतिस्पर्ध्याला हरवताच रेसलर म्हणाला...

Sanga Pushpa Style Video: रेसलिंगच्या रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्याला हरवल्यानंतर सागा याने पुष्पा स्टाईलमध्ये विजय साजरा केला आहे.
WWE NXT Wrestler Sanga Pushpa's Thaggedele Celebration Goes Viral
WWE NXT Wrestler Sanga Pushpa's Thaggedele Celebration Goes Viralfacebook.com/@iamsauravgurjar

WWE Saurav Gurjar Viral Video : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा (Pushpa: The Rise) या चित्रपटाने यावर्षी चांगलीच कमाई केली आहे. चित्रपटातील अल्लूची (Allu Arjun) पुष्पाराजची भूमिका सर्वांनाच आवडली आहे. पुष्पाची क्रेझ मनोरंजन विश्वात तर आहेत सोबतच खेळाच्या पुष्पाची क्रेझ पाहायला मिळाली. अलीकडेच वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चा भारतीय कुस्तीपटू सांगा (सांगा) उर्फ ​​सौरव गुर्जरलाही (Saurav Gurjar) पुष्पाचं वेड लागलं आहे. रेसलिंगच्या रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्याला हरवल्यानंतर सागा याने पुष्पा स्टाईलमध्ये विजय साजरा केला आहे. सागाचा 'मैं झुकेगा नहीं' या डायलॉगचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (WWE Superstar Sanga Viral Video)

हे देखील पाहा -

सागा उर्फ ​​सौरव गुर्जरला हा WWE मधील सर्वोत्तम भारतीय कुस्तीपटूंपैकी एक आहे. त्याने नुकतेच एनएक्सटीच्या एका सामन्यात प्रतिस्पर्धी कुस्तीपटू जिऑन क्विनचा पराभव केला. हा सामना जिंकण्यापूर्वी सागाने पुष्पा स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सागा हा साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुनप्रमाणे पुष्पा स्टाईल करताना पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर रेसलर संगाने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. (WWE Superstar Sanga pays tribute to top South Indian actor)

WWE NXT Wrestler Sanga Pushpa's Thaggedele Celebration Goes Viral
Rajpal Yadav Case : अभिनेता राजपाल यादवला अटक होणार? इंदूर पोलिसांनी बजावली नोटीस

कोण आहे सौरभ गुर्जर?

सौरभ गुर्जर हा एक उत्तम अभिनेता तसेच कुस्तीपटू आहे. सौरभने WWE सोबत करार केला आहे आणि तो अनेक वेळा रिंगमध्ये आपली कमाल दाखवताना दिसला आहे. सौरभचे रिंगमधले नाव 'सांगा' (Sanga) आहे आणि तो चांगल्या-चांगल्यांना मात देतो. याशिवाय तो माजी राष्ट्रीय किक बॉक्सिंग सुवर्णपदक विजेता देखील आहे. सौरभ 'ब्रह्मास्त्र'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात सौरभ गुर्जर खलनायकाची भूमिका साकारत आहे. हा तोच सौरभ आहे ज्याला तुम्ही स्टार पल्सच्या 'महाभारत' शोमध्ये भीमची भूमिका साकारताना पाहिले आहे. सौरभने भीम बनून प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्याचबरोबर आता या चित्रपटात तो पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. सौरभचा लूक पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. केवळ 'महाभारत'च नाही तर सौरभने 'संकटमोचन महाबली' आणि 'ये झुकी झुकी सी नजर' सारख्या टीव्ही शोमध्येही काम केले आहे.

पुष्पा भाग २ पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे

पुष्पा राजचा आयकॉन स्टाइलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अनेक क्रिकेटर्स, सेलिब्रिटी आणि राजकारणी अल्लू अर्जुनप्रमाणे "मैं झुकेगा नहीं" स्टाईल करताना दिसले आहेत. पहिल्या भागाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर पुष्पाचा भाग २ पुढील वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो, अशी माहिती आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनशिवाय साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com