Rajpal Yadav Case : अभिनेता राजपाल यादवला अटक होणार? इंदूर पोलिसांनी बजावली नोटीस

राजपालवर 20 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Rajpal Yadav Case
Rajpal Yadav CaseSaam Tv

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला कोण ओळखत नाही. त्याची विनोदी शैली आणि अभिनय दोन्ही अप्रतिम आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया 2' मध्येही राजपालने केलेली पंडितची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. मात्र, आता राजपाल यादव कायदेशीर अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. राजपालवर 20 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर, इंदूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध नोटीसही जारी केली आहे. (Rajpal Yadav Case Latest News)

Rajpal Yadav Case
मुलींनो ब्रँडेड कपडे घालणाऱ्या तरुणांपासून सावधान! अभ्यासातून धक्कादायक खुलासा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरिंदर सिंग नावाच्या एका बिल्डरने राजपाल यादवविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. आपल्या मुलाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्यासाठी आपण राजपाल यादवला 20 लाख रुपये दिले असल्याचा आरोप सुरिंदर यांनी केला आहे. राजपाल यांनी काम तर मिळवूनच दिलं नाही, शिवाय घेतलेले पैसे परत केले नसल्याचा आरोप सुरिंदर यांनी केला आहे.

सुरिंदर यांनी जेव्हा यादवकडे पैसे परत करण्याची मागणी केली, तेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर, राजपालने सुरिंदर यांचे फोनही बंद उचलणे बंद केल्याचा आरोप आहे. दरम्यान, पैसे परत न मिळाल्याने त्रस्त झालेल्या बिल्डरने राजपालवर यादव विरोधात तुकोगंज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. राजपाल यादव यांना १५ दिवसांत हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

Rajpal Yadav Case
Relationship Tips: अरेंज मॅरेज करताय? मग जोडीदाराला 'हे' प्रश्न आर्वजून विचारायला हवे

दरम्यान, राजपाल यादव हा कायदेशीर अडचणीत सापल्याचे हे काही पहिले प्रकरण नाही, यापूर्वी राजपाल यादवचे नाव एका पोलीस केसमध्ये सुद्धा आले होते. 2010 मध्ये राजपाल यादव हा एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होता. त्यासाठी त्याने एका व्यक्तीकडून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

मात्र, राजपाल यादवने वेळेवर कर्ज न फेडल्याने कर्ज देणार्‍या व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली. तेथे राजपाल यादव 10 कोटी 40 लाखांची रक्कम व्याजासह परत करणार असल्याचे ठरले. दरम्यान, कोर्टाने फटकारल्यानंतरही राजपाल यादवने ते पैसे दिले नाहीत. चेक दिला पण तोही बाऊन्स झाला. यानंतर न्यायालयाने त्यांना तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. मात्र, नंतर राजपालचा जामीन मंजूर झाला होता.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com