Relationship Tips: अरेंज मॅरेज करताय? मग जोडीदाराला 'हे' प्रश्न आर्वजून विचारायला हवे

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग असतो.
Relationship tips in Marathi, Arrange marriage
Relationship tips in Marathi, Arrange marriageब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग असतो. आपल्या प्रत्येकाच्या विचारसरणीनुसार लग्नाची वेगवेगळी मते असतात.(Relationship tips in Marathi)

हे देखील पहा -

हल्ली जोडीदार निवडण्यासाठी अनेक साइट्स आहेत. जोडीदार निवडताना आपली प्रत्येकाची एक वेगळी विचारसरणी असून आपण त्या त्या गटात जोडीदाराला पाहत असतो. काही व्यक्ती लग्न करण्यासाठी अरेंज मॅरेजचा तर काही लव्ह मॅरेजचा पर्याय निवडत असतात. अरेंज मॅरेज करणाऱ्या व्यक्तींना आपल्या जोडीदाराबद्दल अनेक प्रश्न पडलेले असतात पण ते विचारायचे कसे हा प्रश्न त्यांना सतत सतावत असतो आपला जोडीदार त्याच्या भविष्याचा कसा विचार करतो ? त्याचे ध्येय काय आहे ?त्याचे त्याच्या जोडीदाराबद्दल मत काय आहे ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या जोडीदाराला कोणते प्रश्न विचारायला हवे हे जाणून घेऊया.

१. पहिल्या भेटीत आपण एकमेकांना ओळखत नसल्यामुळे त्याच्या घरी कोण राहाते ते विचारा. त्याच्या आवडी-निवडींबद्दल विचारा तसेच स्वत:विषयी देखील सांगा.

Relationship tips in Marathi, Arrange marriage
Skin Care: फोन व लॅपटॉपमधून येणाऱ्या किरणातून चेहऱ्याचे संरक्षण कसे कराल ?

२. आपल्या जोडीदाराला त्याच्या करिअरबद्दल विचारु शकतो. त्याला कशात करिअर करायचे आहे ते पहा. त्याच्या करिअरबद्दलच्या इच्छा समजून घ्या.

३. नोकरीच्या (Job) बाबतीत विचारातांना आपल्या जोडीदाराला परदेशात जायचे आहे का हे आर्वजून विचारा. परदेशात जाण्यासाठी दोघेही तयार असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली मानसिक स्थिती आहे का ते देखील त्याला सांगा.

४. मुलीचे लग्न झाल्यानंतर ती जशी सासरच्या मंडळींना सांभाळते त्याप्रमाणे आपला जोडीदार आपल्या माहेरच्यांना जोडीदारांना सांभाळू शकतो का ते विचारा. त्याचे आपल्या कुटुंबाबद्दल (Family) काय मत आहे हे जाणून घ्या.

५. विवाहाबद्दल आपल्या जोडीदाराचे काय मत आहे हे जाणून घ्या तसेच लग्नांसाठी त्याचे कोणते वेगळे प्लॅन आहेत का ते देखील विचारा तसेच आपल्या काही अपेक्षा असतील तर त्या देखील त्याला सांगा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com