Why I killed Gandhi Movie Controversy
Why I killed Gandhi Movie Controversy  Saam TV
मनोरंजन बातम्या

Why I killed Gandhi: हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज होऊ नये - कॉंग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे याच्या जीवनावर आधारित चित्रपट Why I killed Gandhi (मी गांधीना का मारलं) हा चित्रपट येत्या ३० जानेवारीला रिलीज होत आहे. विशेष म्हणजे यात नथुराम गोडसे याची भुमिका अभिनेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी साकारली आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज होऊ नये म्हणून आता कॉंग्रेस प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहित या चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी आणण्याची मागणी केली आहे. (Why I Killed Gandhi News Updates: Congress party demands to ban the movie ‘Why I killed Gandhi’ in Maharashtra)

हे देखील पहा -

नाना पटोले आपल्या पत्रात म्हटले की, फॅसिस्ट विचारांचे नथुराम गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींची हत्या केली. याच दिवसाचे औचित्य साधून कडव्या विचाराचे चित्रपट निर्माता दिनांक ३० जानेवारी, २०२२ रोजी गांधीजींच्या हत्येचे समर्थन करणारा "Why Kiled Gandhi हा चित्रपट प्रदर्शित करु पहात आहेत.

महात्मा गांधीजींच्या विचाराने संपूर्ण जग प्रभावित आहे. आपल्या भारत देशाची ओळख गांधीजींच्या नावाने होते. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या शस्त्रांचा वापर करून जग जिंकता येते हे महात्मा गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातून दाखवून दिले. म्हणून संपूर्ण जगभर ते परम पूज्यनीय आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचा ३० जानेवारी हा दिवस राष्ट्रीय एकता, जातीय सलोखा, अहिंसा आणि शांतता दिवस म्हणून संपूर्ण जगभरात पाळला जातो. एकीकडे महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीचा दिवस अहिंसा आणि शांतता म्हणून पाळला जात असताना दुसरीकडे अशांतता, द्वेष आणि हिंसक वृत्तीचे प्रदर्शन करणारा Why I Killed Gandhi" हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामुळे फॅसिस्ट वृत्तील बळ मिळेल.

कोणत्याही घृणास्पद व अमानवीय कृत्याचं उदात्तीकरण भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे, म्हणून हा चित्रपट राज्यात कोणत्याही चित्रपटगृह किंवा ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करण्याबाबत काँग्रेस पक्षाची मागणी असून ती मान्य करण्यात यावी, ही विनंती." अशा स्वरुपाचं पत्र नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्याना लिहिलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मुंबई, ठाण्यासह राज्यातील 'या' भागात कोसळणार तुफान पाऊस; IMD कडून अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

Madhuri Dixit : माधुरीच्या सौंदर्याने 'हे' दिग्गज अभिनेते झाले होते घायाळ, मात्र ती पडली डॉक्टरांच्या प्रेमात

Daily Horoscope: या राशींनी सतर्क राहा, ताण-तणावावर नियंत्रण ठेवा; वाचा आजचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: कन्यासह ४ राशीसाठी बुधवार खास, तुमची रास?

Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

SCROLL FOR NEXT