Kalki Koechlin Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kalki Koechlin: कल्की कोचलीन बाळासाठी करायची ब्रेस्ट पंपचा वापर, सोशल मीडियावर व्यक्त केली खंत

कल्कीने तिच्या स्वत:च्या वैयक्तीक आयुष्यातील अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणला आहे. समाजातील लोकांच्या विकृत मानसिकतेवरही तिनं भाष्य केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन(Kalki Koechlin) एक अष्टपैलू अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. कल्कीने चित्रपटांच्या माध्यामातून समाजातील वास्तव जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता कल्कीने तिच्या स्वत:च्या वैयक्तीक आयुष्यातील अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणला आहे. समाजातील लोकांच्या विकृत मानसिकतेवरही तिनं भाष्य केलं आहे.

चित्रपटात अभिनय करत असतानाच ती(Social Media) सोशल मीडियावर सक्रिय राहून अनेक सामाजिक विषयांवरही निर्भीडपणे व्यक्त होत असते. वैयक्तिक आयुष्यात जीवन जगत असतानाच आपल्या कामकाजावर यो गोष्टींचा काही परिणाम होऊ नये म्हणून तिनं शूटिंगच्या दरम्यान बाळासाठी ब्रेस्ट पंपचा वापर करत होती.

कल्कीचे 'देव-डी','द गर्ल इन यलो बूट्स''शांघाय'यांसारखे चित्रपट समाजात जनजागृती करणारे आहेत. तसेच कल्की स्वत: समाजातील गंभीर विषयांवर स्पष्ट भूमिका मांडत असते. कल्कीने फेब्रुवारी २०२० मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. नुकताच तिने सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो खूप बोलका आहे. कारण या फोटोत कल्की आई झाल्यानंतर आयुष्य कसं जगावं लागंत, याचं उत्तम उदाहरण सर्वांसमोर आणलं आहे. कल्कीने तिच्या वैयक्तिक जीवनातील काही अनुभवांचा खुलासा करत म्हटलं की, शूटिंग सुरु असताना तिला बाळासाठी ब्रेस्ट पंपचा वापर करावा लागत होता. कल्कीने फोटोच्या कॅप्शनमध्ये 'मॉम्स गिल्ट'असे लिहून याबद्दल खंतही व्यक्त केली आहे.

या फोटोत कल्की मेकअप करताना दिसत आहे. त्याचबरोबर तिने ब्रेस्ट पंप मशीन लावली आहे. कल्कीचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला असून तिचे सर्वच स्तरातून कौतुकही केले जात आहे.एका चाहत्याने लिहिले की,'आम्हा सर्वांना माहित आहे की, तुम्ही उत्तम काम करत आहात. तुम्हाला जे करायचं आहे, ते करुनच तुम्ही समाजात एक उत्तम नागरिक बनू शकता. नेहमी अशीच राहा आणि कधीही बदलू नका, कारण अशा भूमिकेमुळंच तुम्ही जगावेगळं बनू शकता. दुसर्‍या युजरने म्हटलं की, खरंच तू खूप सुंदर स्त्री आहेस.'ब्रेस्ट पंपमुळे तिला किती त्रास सहन करावा लागला, हे देखील कल्कीने यापूर्वी सांगितले होते.

कल्की कोचलीन चित्रपट निर्माता अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. कल्कीने तिच्या मुलीचे नाव सॅफो ठेवले आहे आणि अनेकदा कल्की तिच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कल्की कोचलीनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर कल्कीने नुकतेच तिच्या 'गोल्डफिश' आणि 'एम्मा अँड एंजल'या दोन चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले आहे.लवकरच ती तिच्या प्रसिद्ध वेब सीरिज'मेड इन हेवन'च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT