Aamir Khan on Bollywood Parties : आमिर खानने केला बॉलिवूड पार्ट्यांचा पर्दाफाश; म्हणाला...

एका मुलाखतीत आमिरने बॉलिवूड पार्ट्यांमध्ये काय घडते याचा खुलासा केला आहे.
Aamir Khan
Aamir Khan Saam Tv

Aamir Khan on Bollywood Parties |मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान(Aamir Khan) गेल्या काही काळापासून करिना कपूरसोबत(Kareena Kapoor) त्याच्या आगामी चित्रपट 'लाल सिंग चड्ढा'चे(Laal Singh Chadha) प्रमोशन करत आहे. प्रमोशन दरम्यान, एका मुलाखतीत आमिरने बॉलिवूड पार्ट्यांमध्ये काय घडते याचा खुलासा केला आहे. 'कान फाडणाऱ्या' संगीतातील पार्ट्यांमध्ये लोक काय करतात आणि त्यांना या पार्ट्या का आवडतात, असा टोला त्याने लगावला आहे. विशेष म्हणजे करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत घडलेला प्रकारही आमिरने सांगितला.

आमिर खान नुकताच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण-७' या चॅट शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये आमिर खान अभिनेत्री करीना कपूरसोबत त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. शो दरम्यान करण जोहर आमिर खानला टोला मारत म्हणाला की, 'आमिर खूप कंटाळवाणा आहे आणि तो पार्ट्यांमध्ये कधीही सहभागी होतं नाही.

Aamir Khan
Friendship Day : करण जोहर आणि फराहच्या मैत्रीला २५ वर्षे पूर्ण; शेअर केला एक मजेदार व्हिडिओ

करणच्या या वक्तव्यावर प्रतिउत्तर देत आमिर म्हणाला की, 'बॉलिवूड पार्ट्यांमध्ये काय होते हे मलाच समजत नाही. या पार्ट्यांमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजते आणि बोलणे अवघड होऊन बसते, पार्ट्यांमध्ये एवढं मोठ्या आवाजात संगीत का वाजवलं जातं, त्यामुळे कानाचे पडदे फाटतात', असं आमिर म्हणाला.

Aamir Khan
Uunchai : अमिताभ बच्चन यांच्या 'उचाई' चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर फ्रेंडशिप डेला रिलीज

आमिरने पुढे नुकतेच झालेल्या करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीचे उदाहरण दिले. 'मी पार्टीमध्ये एका उंच स्टेजवर उभा राहून पार्टी पाहत होतो तिथे खूप मोठ्या आवाजात गाणी वाजत होती आणि कोणीही नाचत नव्हते. गाणी इतक्या जोरात वाजत होत्या की बोलत असताना लोकांच्या मानेच्या नसा दिसत होत्या', असा आमिर खानने करण जोहरच्या पार्टीतील एक किस्सा सांगितला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com