OTT Release This Weekend Saam TV
मनोरंजन बातम्या

OTT Release This Weekend : ‘या’ आठवड्यात पाहता येणार क्राईम, ड्रामा, थ्रिलर चित्रपट आणि वेबसीरीज, जाणून घ्या यादी

Upcoming Movies And Web Series : ६ मे ते १२ मे या दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही घरात बसून ॲक्शन, थरार आणि नाट्य असणारे चित्रपट पाहू शकतात.

Chetan Bodke

OTT हे माध्यम प्रेक्षकांना मनोरंजनासाठी उत्तम माध्यम आहे. OTT वर प्रेक्षकांचे सर्वच प्रकारचे मनोरंजन होते. प्रेक्षक सर्वाधिक चित्रपट, वेब शो आणि वेब सीरिज पाहण्यासाठी OTT चा वापर करतात. OTT वर प्रेक्षकांना थिएटरमध्ये रिलीज झालेले चित्रपटही पाहायला मिळतात. दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात. अशातच जाणून घेऊया, या आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल...

अनदेखी सीझन 3- Undekhi Season 3

नंदीश संधू आणि हर्ष छाया स्टारर 'अनदेखी ३' ही वेबसीरिज ओटीटीवरील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या वेबसीरिजमधील आहे. ही वेबसीरिज OTT वर येत्या १० मे रोजी ‘सोनी लिव्ह’ (Sony Liv) वर रिलीज होणार आहे. तुम्ही ही सीरिज हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, मराठी आणि बंगाली या भाषांमध्ये पाहू शकाल.

मर्डर इन माहीम- Murder In Mahim

आशुतोष राणा आणि विजय राज स्टारर ‘मर्डर इन माहीम’ ही वेब सीरिज येत्या १० मे रोजी रिलीज होणार आहे. ह्या वेबसीरिजचे कथानक २०१३ मध्ये माहिममध्ये झालेल्या एका हत्येवर आधारित आहे. ही वेब सीरिज ‘जिओ सिनेमा’ या ओटीटीवर रिलीज होणार आहे.

आडुजीविथम - द गोट लाईफ- Aadujeevitham The Goat Life

'आडुजीविथम-द गोट लाइफ' हा सर्वाइवल ड्रामा चित्रपट येत्या १० मे रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. ब्लेसी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचं कथानक आहे. ‘डिज्ने प्लस हॉटस्टार’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.

8 एएम मेट्रो- 8 A.M. Metro

सैयामी खेर आणि गुलशन देवैया स्टारर ‘8 एएम मेट्रो’ हा चित्रपट येत्या १० मे रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांना ‘झी ५’ (Zee 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

जानकी समसारा- Janaki Samsara

जानकी समसारा ही कन्नड वेबसीरिज आहे. ६ मेला ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’वर ही रिलीज पाहता येईल.

डॉक्टर हू- Doctor Hu

'डॉक्टर हू' चित्रपट ११ मे रोजी ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’वर रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT