12th Fail Submitted For Oscars 2024 Saam Tv
मनोरंजन बातम्या

12th Fail Submitted For Oscars 2024: विधू विनोद चोप्रांचा12 th Fail’ ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत, भाईजानच्या ‘टायगर ३’ ची जादू पडली फिकी

‘12 th Fail’ At Oscar: विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘12 th Fail’ चित्रपट 96व्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात आला आहे.

Chetan Bodke

12th Fail Submitted For Oscars 2024

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेसी सध्या त्याच्या ‘12 th Fail’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर चित्रपटाला ऑस्करमध्ये नामांकन मिळाले आहे. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘12 th Fail’ चित्रपट 96व्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात आला आहे. (Bollywood)

चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन, एक महिना झाला आहे. या आगामी वर्षात चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवणार आहेत. चित्रपट रुपेरी पडद्यावर एक यशस्वी चित्रपट ठरला आहे. चित्रपटातल्या प्रत्येक कलाकाराने केलेल्या कामाची पोचपावती या पुरस्कारातून मिळणार आहे. चित्रपटाला १० मार्च २०२४ रोजी ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवणार आहेत. चित्रपटाला ‘स्वतंत्र नामांकन’ म्हणून पाठवले आहे. (Bollywood Film)

विक्रांत मॅसीने पुरस्काराविषयीची माहिती,‘साहित्य आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत दिली. ‘12 th Fail’ ने बॉक्स ऑफिसवर एका महिन्यात जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपट जेमतेम २० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला आहे. चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ४५.१० कोटी रुपयांची कमाई केली. सलमान खानचा 'टायगर ३' देखील '१२वी फेल'समोर अपयशी ठरला. (Oscars)

अनुराग पाठक यांनी लिहिलेल्या ‘12 th Fail’ या सर्वाधिक विकल्या गेलेल्या कादंबरीवर चित्रपटाची निर्मिती केली. जी कांदबरी आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या अद्भुत प्रवासावर आधारलेली आहे. (Bollywood News)

‘12 th Fail’चे दिग्दर्शन ‘3 इडियट्स’चे निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओने केली आहे. ‘12 th Fail’ हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. 12वी फेल हिंदीसह तामिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज झाला. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT