दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी सीएसएमटी रेल्वेस्थानकासह काही ठिकाणी केलेल्या हल्ल्याला आज १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १० दहशतवादी समुद्रामार्गे शिरत त्यांनी मुंबईवर भ्याड हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये त्या दहशतवाद्यांनी सीएसएमटी रेल्वे स्टेशन, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर,ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमासह बऱ्याच ठिकाणी बॉम्बहल्ले आणि गोळीबार केला.
या घटनेचा साधा विचार केला, घटनेबद्दल वाचलं तरी आजही अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. या घटनेवर अनेक चित्रपट, शॉर्टफिल्म्स आणि वेबसीरीज रिलीज झाले. चला तर जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल आणि वेबसीरीजबद्दल
‘द ॲटेक ऑफ 26/11’ (The Attack of 26/11)
हा चित्रपट २०१३ मध्ये रिलीज झालेला आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, संजीव जयसवाल, नाना पाटेकर, गणेश यादव, अतुल कुलकर्णी, जितेंद्र जोशीसह बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकार प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट तुम्ही ॲक्शन थ्रिलर चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. (Bollywood Film)
मेजर (Major)
मेजर संदीप उण्णीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये, दाक्षिणात्य अभिनेता आदिवी शेषने मुख्य भूमिका साकारली असून त्याच्या पत्नीच्या भूमिकेत सई मांजरेकर आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. (Bollywood News)
‘हॉटेल मुंबई’ (Hotel Mumbai)
२६/११ हल्ल्यावर आधारित हा चित्रपट असून चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत देव पटेल, नाझानिन बोनियाडी, अनुपम खेरसह अनेक हॉलिवूड कलाकार सुद्धा मुख्य भूमिकेत दिसत आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
‘फँटम’ (Phantom)
२०१५ मध्ये सलमान- कतरिनाचा हा चित्रपट रिलीज झाला होता. कबीर खान दिग्दर्शित चित्रपटामध्ये २६/११ च्या हल्ल्यातल्या संशयितांना मारण्याच्या धोकादायक मिशनवर जाताना सैनिकांना कशाप्रकारे संकटांचा सामना करावा लागतो, हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
‘वन लेस गॉड’ (One Less God)
या चित्रपटामध्ये फक्त भारतीय कलाकाराच नाही तर हॉलिवूडमधीलही दिग्गज कलाकारांची स्टारकास्ट दिसत आहे. चित्रपट थिएटरमध्ये २०१७ ला रिलीज झाला होता. हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट ॲमेझोन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
मुंबई डायरीज 26/11 (Mumbai Diaries 26/11)
या वेबसीरीजचे प्रेक्षकांच्या भेटीला एकूण दोन सीझन आले आहेत. मोहित रैना, नताशा भारद्वाज, श्रेया धन्वंतरी, मृण्मयी देशपांडेसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहेत. दोन्ही सीझनला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही ड्रॅमेटिकल वेबसीरीज ॲमेझोन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.