Vijay patkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vijay patkar: ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकरांचा मोठा गौप्यस्फोट; चित्रपट महामंडळ निवडणुकीत राजकीय दबावाचा आरोप

Vijay patkar: अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप आणि दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केला आहे. तसेच त्यांनी चित्रपट महामंडळात सुरु असलेल्या कामकाजावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Shruti Vilas Kadam

Vijay patkar: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीबाबत गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असून, काही लोक जाणीवपूर्वक माझ्याविरोधात राजकारण करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

सध्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक चर्चेत आहे. तब्बल दहा वर्षांनंतर ही निवडणूक होत असून, अनेक कलाकार आणि सदस्य यात सहभागी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर विजय पाटकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक धक्कादायक दावे केले. त्यांनी सांगितले की, त्यांनी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता. मात्र काही लोकांनी राजकारण करून त्यांचा अर्ज प्रक्रियेतून पुढे जाऊ दिला नाही.

सध्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक चर्चेत आहे. तब्बल दहा वर्षांनंतर ही निवडणूक होत असून, अनेक कलाकार आणि सदस्य यात सहभागी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर विजय पाटकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक धक्कादायक दावे केले. त्यांनी टिव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांनी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता; मात्र काही लोकांनी राजकारण करून त्यांचा अर्ज प्रक्रियेतून पुढे जाऊ दिला नाही.

विजय पाटकर यांनी महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावरही थेट निशाणा साधला. “मागील दहा वर्षांत महामंडळासाठी नेमकं काय केलं? संस्थेचं अक्षरशः थडगं करून ठेवलं आहे,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी कर्मचाऱ्यांना सात महिने पगार दिला गेला नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

इतकंच नाही तर एका मंत्र्यांच्या कार्यालयाकडून निवडणुकीत दबाव आणला जात असल्याचाही दावा त्यांनी केला. “एका मंत्र्यांचा ओएसडी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडून बसला आहे. कोण उमेदवार असावा, कोण नसावा यासाठी दबाव टाकला जात आहे. मला कळत नाही त्या मंत्र्यांची आणि ओएसडी यांची विधानभवनातील सगळी कामं संपली आहेत का? जेणेकरून ते चित्रपट महामंडळात ठाण मांडून बसले आहेत. मागील 40 वर्षे आम्ही इंडरस्ट्रीत आहोत. आम्ही कधी राजकारण्यांकडे येतो का? त्यांनी कशाला इकडे यायला हवं. असा आक्रमक सवाल त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'50 कोटींचं डील, 15 कोटी अ‍ॅडव्हान्स'; खासदारांना हमीभाव, संजय राऊतांचा आरोप

Omraje Nimbalkar: हक्काचे खासदार ओमराजेंनी का सोडली ठाकरेंची साथ?, 'कोर्टाच्या निकालासाठी ओमराजे फुटले'

ठाकरेंपाठोपाठ पवारांचेही खासदार फुटणार? राष्ट्रवादीचे 3 खासदार NDAच्या संपर्कात?

Operation Tiger: पुन्हा शिवसेना फोडली! 6 खासदाराचं शिंदेसेनेत विलिनीकरण होणार? खासदारांच्या अपात्रतेसाठी ठाकरेसेनेची रणनीती

Operation Tiger: ४ वर्षांनंतर पुन्हा राजकीय भूकंप, ठाकरेसेनेचे ६ खासदार शिंदेसेनेच्या वाटेवर; वाचा'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT