Kalyan Accident News : कल्याणमध्ये भीषण अपघात! विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी भरधाव रिक्षा उलटली, ६ जण गंभीर जखमी

Kalyan Bus Auto Accident News Update : कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा पलटी होऊन चार विद्यार्थी जखमी झाले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे.
KALYAN SCHOOL RICKSHAW ACCIDENT: FOUR STUDENTS INJURED AFTER AUTO OVERTURNS IN WALDHUNI
KALYAN SCHOOL RICKSHAW ACCIDENT: FOUR STUDENTS INJURED AFTER AUTO OVERTURNS IN WALDHUNISaam Tv
Published On
Summary
  • कल्याण पूर्वेत शाळकरी विद्यार्थ्यांची रिक्षा पलटी झाली

  • अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून सर्वांची प्रकृती स्थिर

  • भरधाव बस पाहून रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

  • जखमी विद्यार्थ्यांवर रुक्मिणीबाई व खासगी रुग्णालयात उपचार सुरू

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

Kalyan Waldhuni Road Accident News कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातील मार्टिन चौक येथे गुरुवारी सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित रिक्षा वालधुनी परिसरातून कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकाजवळ असलेल्या नॅशनल उर्दू शाळेकडे विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. रिक्षामध्ये चालकासह एकूण सहा विद्यार्थी प्रवास करत होते. सकाळच्या वेळेत रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असताना समोरून भरधाव वेगाने येणारी बस दिसताच रिक्षाचालकाने वाहनावरील नियंत्रण गमावले. त्यामुळे रिक्षा अचानक रस्त्यावर पलटी झाली.

KALYAN SCHOOL RICKSHAW ACCIDENT: FOUR STUDENTS INJURED AFTER AUTO OVERTURNS IN WALDHUNI
Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. भर रस्त्यात रिक्षा उलटल्याचे पाहताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रिक्षेमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. तसेच जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांवर कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एका विद्यार्थ्याला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

KALYAN SCHOOL RICKSHAW ACCIDENT: FOUR STUDENTS INJURED AFTER AUTO OVERTURNS IN WALDHUNI
Health Care : जेवल्या जेवल्या लगेच प्रचंड झोप येतेय? तुमच्या ताटातच दडलंय 'हे' मोठं कारण

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. तसेच बसचा वेग, रिक्षाचालकाचे नियंत्रण कसे सुटले आणि वाहतुकीच्या परिस्थितीची तपासणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com