Vijay Deverakonda and Mrunal Thakur team up For Upcoming Movie Instagram @mrunalthakur
मनोरंजन बातम्या

Vijay Deverakonda - Mrunal Thakur Team Up: विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर दिसणार एकाच फ्रेममध्ये, संपन्न झाला चित्रपटाचा मुहूर्त...

Vijay Deverakonda and Mrunal Thakur : विजय आणि मृणाल एथनिक कपड्यांमध्ये सुंदर दिसत आहे.

Pooja Dange

Vijay Deverakonda - Mrunal Thakur Sharing Screen : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. विजय देवरकोंडा नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतो. विजय हा लवकरच निर्माता परशुरामसोबत पुन्हा एकदा काम करणार असल्याची सांगण्यात येत आहे. याआधी या जोडीने 'गीता गोविंदा' या चित्रपटात एकत्र काम केले होते. पण आता विजय देवरकोंडा आणि परशुराम यांच्या नव्या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

या चित्रपटात एक नवीन जोडी सर्वांच्या भेटीला येणार आहे. 'सीता रामम' या चित्रपटातून तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर या चित्रपटामध्ये दिसणार आहे. (Latest Entertainment News)

मृणालने आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावले आहे. दुल्कर सलमाननंतर आता मृणाल विजयसोबत झळकणार आहे. चित्रपटाचं नाव अजून जाहीर करण्यात आले नाही. या चित्रपटाला अजून तरी 'एसव्हीसी ५४' असे नाव देण्यात आले आहे. चित्रपटाचे नाव जरी जाहीर करण्यात आलं नसलं तरी 'वीडी १३' असा टॅग त्यांनी शेअर केला आहे.

चित्रपटाची कास्ट जाहीर करताना एक पुजा करण्यात आली. या पुजेत संपूर्ण टीम सहभागी होती. या पुजेचा व्हिडिओ विजयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात चित्रपटाची संपूर्ण टीम पुजा करताना दिसत आहे.

विजय आणि मृणाल एथनिक कपड्यांमध्ये सुंदर दिसत आहे. विजयने हिरव्या रंगाचा कुर्ता घातला आहे तर मृणालने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला लवकरचं सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विजयने हा व्हिडिओ पोस्ट करुन कॅप्शनमध्ये 'पुजा' असं लिहल आहे आणि 'परशुराम-दिल राजू-मृणाल ठाकूर आणि तुमचा माणूस' असं लिहिलं आहे.

मृणालने या पुजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'नवीन प्रवासासाठी पहिलं पाऊन. 'श्रीव्यंकटेश्वरक्रिएशन' सोबत काम करण्याची पहिली वेळ, विजय देवरकोंडासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे'. असं लिहून नवीन चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं.

विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर त्याचा 'कुशी' आणि 'जन-गण-मन' हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृणालबद्दल बोलायचे तर मृणालच्या 'सीता रामम' नंतर अजून एक तेलगु चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय आणि मृणाल या दोन सुपरहिट कलाकारांच्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर मृणालने लस्ट स्टोरीज २ मध्येही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT