Akshay Kumar Upcoming Movie : अखेर तारीख ठरली! अक्षय कुमारचा 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' या दिवशी होणार प्रदर्शित

Akshay Kumar Movie Released Date : 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' असे या चित्रपटाची नाव असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारखेची घोषणा झाली आहे.
The Great Indian Rescue Released Date Out
The Great Indian Rescue Released Date OutTwitter
Published On

The Great Indian Rescue Released Date Out : बॉलिवूडमधील अॅक्शन हिरो अक्षय कुमार नवीन चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.अक्षय पुन्हा एकदा तडफदार भूमिकेतून दिसणार आहे. 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' असे या चित्रपटाची नाव असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारखेची घोषणा झाली आहे.

'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट मायनिंग इंजिनियर जसवंत सिंह गिल यांच्या आयुष्यावर बनविण्यात आला आहे. जसवंत सिंह गिल हे मुळचे पंजाबचे राहणारे.

१९८९ मध्ये पश्चिम बंगालमधील रानीगंज या मिलमध्ये झालेल्या घटनेचे पडसाद आजही आहेत. त्यावेळेस मिलमध्ये आलेल्या पुरात जसवंत सिह गिल यांनी जीवाची बाजी लावत ६४ मुलांना वाचवलं होते. (Latest Entertainment News)

The Great Indian Rescue Released Date Out
South Actor Prabhu Dies: मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते; प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचं उपचाराअभावी निधन

त्या वर्षी मिलमध्ये झालेल्या घटनेने अक्षरश थैमान घातले होते. त्यात देवदूत म्हणून आलेल्या जसवंत सिंहाची गिल यांची कामगिरी ही खूप मोठी आहे. जसवंत सिंह गिलना त्यांच्या या कामगिरीसाठी अनेक अवॉर्डसनेही त्यांना सन्मानित केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे आज खूप कुटुंब सुखी आहेत. त्यांच्या आयुष्यावर आधारित द ग्रेट इंडियन रेस्क्यू हा चित्रपट ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारचा या बायोग्राफिकल चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. अक्षय कुमारने याआधीही 'रुस्तम' हा खऱ्या आयुष्यातील घटनेवर आधारित चित्रपट केला होता. 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' या चित्रपटात अक्षयसोबत परिनीती चोप्रा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अक्षय आणि परिनीती याआधी 'केसरी' या चित्रपटात एकत्र झळकले होते. बऱ्याच काळानंतर अक्षय आणि परिनीतीला एकत्र पाहण हे फार रंजक ठरणार आहे.

अक्षयने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. परंतु अलीकडच्या काळातील त्याचे सर्वच चित्रपट फ्लॉप ठरले. इमरान हाशमी सोबत आलेला सेल्फी हा चित्रपट त्याचा शेवटचा चित्रपट होता. आगामी काळात तो टायगर श्रॉफ सोबत चित्रपटामध्ये काम करणार आहे.

तर परिणीती चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती लाईमलाइटमध्ये असते. नुकताच तिचा साखरपुडा झाला आहे. आप नेते राघव चड्ढाशी परिणीती लग्न करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com