Vijay deverakonda-Rashmika Mandanna Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vijay-Rashmika Engagement: अखेर रश्मिका-विजयचं ठरलं! गुपचूप साखरपुडा उरकला; लग्नाची तारीख आली समोर

Vijay deverakonda-Rashmika Mandanna Engagement Photos: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी साखरपुडा केल्याची बातमी समोर आली आहे. या दोघांनी एका खाजगी समारंभात साखरपुडा केला आहे.

Siddhi Hande

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाने केला साखरपुडा

गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपच्या होत्या चर्चा

पुढच्या वर्षी अडकणार लग्नबंधनात

साउथ इंडस्ट्रीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाल्याची माहिती समोर आहे.गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु होती. त्यातच आता त्या दोघांनी साखरपुडा केला आहे.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचा झाला साखरपुडा

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना (Vijay deverakonda-Rashmika Mandanna Engagement) यांनी एका खाजगी समारंभात साखरपुडा केला आहे. M9 न्यूजने याविषयी माहिती दिली आहे. त्या दोघांनी फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रपरिवारासोबत साखरपुडा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता दोघांनी एन्गेजमेंट केली आहे. या दोघांच्या नात्याबाबत अजूनही त्या दोघांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून विजय आणि रश्मिका (Vijay deverakonda-Rashmika Mandanna Relationship) अनेकदा एकत्र स्पॉट होत होते. त्या दोघांचे एकाच ठिकाणी फिरायला गेलेले फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघेही एकाच ठिकाणाहून फोटो पोस्ट करायचे. त्यामुळे दोघे एकत्र फिरायला गेले असल्याचेही बोलले जात होते. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा होत होत्या. आता या दोघांचा साखरपुडा झाला आहे.

लग्नाची तारीख आली समोर (Vijay deverakonda-Rashmika Mandanna Wedding Date)

मिडिया रिपोर्टनुसार, विजय देवरकोंडा आणि रश्मिका यांच्या लग्नासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. अजून याबाबत अधिकृक माहिती समोर आलेली नाही. मिडिया रिपोर्टनुसार, रश्मिका- विजय फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करणार आहेत. दरम्यान, याबाबत ही जोडी लवकरच अधिकृत घोषणा करेल. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या साखरपुड्याच्या बातमीने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जळगाव शासकीय रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला, बेदम मारहाणीत डॉक्टर रक्तबबाळं

Nagpur : नागपुरातील बिझनेसमन अन् पत्नीचा इटलीत मृत्यू, फिरायला गेल्यावर काळाचा घाला

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८७०० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Waterfront Indie Film Festival: 'वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल'ला सुरूवात, नवोदित कलाकारांना मिळणार मोठी संधी

Shocking: भयानक घटना! सिनेमात काम देण्याचं आमिष, १५ वर्षाच्या मुलीला ड्रग्ज दिले, १८ महिने बलात्कार

SCROLL FOR NEXT