Sam Bahadur Trailer Instagram
मनोरंजन बातम्या

Sam Bahadur Trailer Out: ‘तुम राजनिती सांभालो...’ थेट उत्तरं देणाऱ्या ‘सॅम बहादुर’चा ट्रेलर रिलीज; डायलॉग अन् कथेने जिंकलं मन

Vicky Kaushal Film Trailer Released: मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादुर’चा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.

Chetan Bodke

Sam Bahadur Trailer Released

मेघना गुलजार दिग्दर्शित आणि बहुचर्चित ‘सॅम बहादुर’ची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. पोस्टर आणि धडाकेबाज टीझरनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला चित्रपटाचा ट्रेलरही आला आहे. सध्या विकी कौशलच्या ह्या बहुप्रतिक्षित ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाची कथा भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दमदार डायलॉग आणि भारदस्त कथा असलेल्या ‘सॅम बहादुर’च्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतोय. १९७१च्या बांगलादेश स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यात पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारे भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचं आयुष्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये, प्रेक्षकांना सॅम बहादुर यांच्या ४० वर्षांच्या नोकरीमधले महत्वाचे टप्पे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभिनेत्याचा लूक आणि डायलॉग्सने चाहत्यांचे लक्ष वेधलेय. (Bollywood Film)

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत विकी कौशलसोबत फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा सुद्धा दिसणार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजारने केली आहे. विकी कौशल सॅम बहादुरच्या भूमिकेत, फातिमा सना शेख इंदिरा गांधींच्या भूमिकेत तर सान्या मल्होत्राने सॅम बहादुरच्या पत्नीचे पात्र साकारले आहे. सोबतच नीरज काबी, मोहम्मद झीशान अयुब, आशिष विद्यार्थी यांसारखे दमदार कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. (Entertainment News)

गेल्या अनेक वर्षांपासून दिग्दर्शक मेघना गुलजार चित्रपटावर काम करत आहेत. चित्रपट येत्या १ डिसेंबर २०२३ ला रिलीज होणार आहे. त्याच दिवशी रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ही प्रदर्शित होणार आहे. या दोन्हीही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई कोण करणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT