Chhaava SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava : महाराष्ट्रानंतर दक्षिणेतही 'छावा' फोडणार डरकाळी! तेलुगू भाषेतील धमाकेदार ट्रेलर रिलीज

Chhaava Telugu Movie Trailer : विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा तेलुगू भाषेतील ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमधील तेलुगू संवादांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

Shreya Maskar

जगभरात 'छावा'ला (Chhaava ) हिंदी भाषेत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता 'छावा'ची डरकाळी टॉलिवूडमध्ये ऐकू येणार आहे. 'छावा' चित्रपट तेलुगू भाषेत पाहता येणार आहे. ज्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. अलिकडेच चित्रपटाच्या तेलुगू भाषेतील रिलीजची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता 'छावा' चित्रपटाचा तेलुगू भाषेतील ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

'छावा' तेलुगू भाषेतील ट्रेलर रिलीज

'छावा' चित्रपटाचा तेलुगू भाषेतील ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. 'छावा' चित्रपट 7 मार्च 2025 रोजी तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर रिलीजच्या पोस्टला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. त्यांनी लिहिलं की, "धैर्य आणि गौरवाचा भव्य नजारा आता तेलुगूमध्ये" सध्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

'छावा' तेलुगू ट्रेलर रिलीजमध्ये तेलुगू भाषेतील संवादाची आणि गाण्यांची झलकही पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपट तेलुगु भाषेत रिलीज झाल्यानंतर त्याच्या कामाईत अजून झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळणार आहे. 'छावा'चित्रपटाचे प्रदर्शन टॉलिवूडमधील लोकप्रिय प्रोडक्शन हाऊस 'गीता आर्ट्स'कडून केले जाणार आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये चित्रपट पाहता येणार आहे.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन

विकी कौशलचा 'छावा' चित्रपटाने 18 दिवसात 480.06 कोटी रुपयांची कमाई केली आहे.आता हा चित्रपट लवकरच 500 कोटींचा व्यवसाय करणार आहे. 'छावा' चित्रपटाने जगभरात 600 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.

'छावा' चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईची भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' मराठीनंतर हिंदीतही १ नंबरवर! रितेश भाऊंनी रचला इतिहास, कमावले तब्बल 'इतके' कोटी

Salman Khan: 'माझं नाव खराब होतंय...'; 'काला हिरण' चित्रपटावरून सलमान खान भडकला, थेट कोर्टात ठोकली धाव!

Veen Doghantali Hi Tutena Video : स्वानंदीचा रुद्रावतार! शेवटची संधी दिली अन् दिराला कानाखाली लगावली; समरनेही घेतला 'हा' मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी 16 उमेदवारांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra News : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक! पुणे नाशिक महामार्ग रोखला, तरुणाचा विषारी औषध पिण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT