
'छावा' (Chhaava ) चित्रपट 14 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बंपर कमाई केली आहे. 'छावा'चे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून चित्रपटातून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'छावा' विकीच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
'छावा' पहिला दिवस 33.1 कोटी रुपये
दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये
तिसरा दिवस - 48.5 कोटी रुपये
चौथा दिवस 24 कोटी रुपये
पाचवा दिवस - 24.50 कोटी रुपये
सहावा दिवस - 32 कोटी रुपये
सातवा दिवस - 21.5 कोटी रुपये
आठवा दिवस - 23 कोटी रुपये
नववा दिवस - 45 कोटी रुपये
दहावा दिवस - 40 कोटी रुपये
अकरावा दिवस - 19.10 कोटी रुपये
बारावा दिवस - 18.5 कोटी रुपये
तेरावा दिवस - 21.75 कोटी रुपये
चौदावा दिवस- 12 कोटी रुपये
पंधरावा दिवस - 400 कोटींचा टप्पा पार
सोळावा दिवस - 21 कोटी रुपये
सतरावा दिवस - 25 कोटी रुपये
अठरावा दिवस - 8.50 कोटी रुपये
'छावा' चित्रपटाने जगभरात 600 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. आता हा चित्रपट लवकरच 500 कोटींचा व्यवसाय करणार आहे. 'छावा' चित्रपटात महाराणी येसूबाईची भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना (Akshaye Khanna) झळकला आहे. 'छावा'मध्ये अनेक मराठी कलाकार पाहायला मिळाले आहेत. 'छावा' चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपट चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत. 'छावा' चित्रपट तीन ते चार महिन्यांनंतर तुम्हाला घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र अद्याप निर्मात्यांनी ओटीटी रिलीजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.