Ranveer Allahbadia Controversy: रणवीर इलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; 'या' अटीवर करु शकणार शोची सुरुवात

Ranveer Allahbadia Controversy High Court: रणवीर अलाहाबादियाच्या अश्लील टिप्पणीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. त्याचा शो सुरू करण्यासाठी न्यायालयाने काही अटीही घातल्या आहेत.
Ranveer Allahbadia
Ranveer Allahbadiasocial media
Published On

Ranveer Allahbadia Controversy: रणवीर इलाहाबादियाला आज सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. पालकांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने एका अटीवर 'द रणवीर शो' सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत अलाहाबादिया यांना अटकेपासून संरक्षण दिले आणि त्यांना गुवाहाटी येथे चौकशीत सामील होण्यास सांगितले.

या अटीवर होणार शो सुरु

सर्वोच्च न्यायालयाने पॉडकास्टर रणवीर इलाहाबादियाला 'द रणवीर शो'चे प्रसारण पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे, त्यांनी त्यांच्या शोमध्ये शालीनता राखली पाहिजे ही अट न्यायालयाने घातली आहे. इंडियाज गॉट लेटेंटच्या सुरू असलेल्या प्रकरणात, युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. रणवीरच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की त्याच्याकडे २८० कर्मचारी आहेत आणि हेच त्याचे उपजीविका साधन आहे.

Ranveer Allahbadia
Javed Akhtar On Kangana Ranaut: 'मी पैसे मागितले....'; कंगनासोबत वाद मिटल्यानंतर पहिल्यांदाच जावेद अख्तरांनी व्यक्त केल्या भावना

सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे निर्देश

रणवीर इलाहाबादिया यांना सध्या परदेशात जाण्याची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. चौकशीत सामील झाल्यानंतरच परवानगी देता येईल, असे न्यायालयाने म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सोशल मीडियावरील सामग्रीचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास सांगितले. यासाठी सर्व भागधारकांकडून सूचना मागवण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाने रणवीर इलाहाबादियाला 'द रणवीर शो' सर्व वयोगटातील लोकांसाठी हमीपत्र देण्यास सांगितले.

Ranveer Allahbadia
R Madhavan: सोशल मीडियावर तरुणीशी फ्लर्ट करतोय आर.माधवन? स्वतःच खुलासा करत म्हणाला, 'चाहत्यांच्या मॅसेजचे...'

केंद्र सरकारलाही मिळाले महत्त्वाचे निर्देश

वादाच्या पार्श्वभूमीवर, आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे आणि एक मोठा आदेश दिला आहे. न्यायालयाने केंद्राला ऑनलाइन कंटेंटचे नियमन करण्यास सांगितले आहे आणि त्यासाठी संबंधित लोकांचे मत मागवण्यास सांगितले आहे.

हे संपूर्ण प्रकरण आहे

रणवीर इलाहाबादियाला बिअर बायसेप्स म्हणूनही ओळखले जाते. गेल्या महिन्यात त्याने इंडियाज गॉट टॅलेंट या रोस्ट शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी करून मोठा वाद निर्माण केला होता. विनोदी कलाकार समय रैना यांच्या होस्टिंग शोमध्ये, इलाहाबादियाने एका स्पर्धकाला विचारले, "तुम्ही तुमच्या पालकांना आयुष्यभर दररोज सेक्स करताना पाहाल की एकदा त्यात सामील होऊन ते कायमचे थांबवाल?" या कमेंटचा एक व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर रणवीरवर बरीच टीका झाली. यानंतर, रणवीर अलाहबादिया, समय रैना आणि शोशी संबंधित इतरांविरुद्ध अनेक पोलिस तक्रारी दाखल करण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com