Chhaava Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection: 'छावा'चा बोलबाला; लवकरच पार करणार ५०० कोटींचा टप्पा

Chhaava Box Office Collection Day 20 : विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने २० दिवसांत कोट्यवधींचा व्यवसाय केला आहे. 'छावा'ने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

Shreya Maskar

लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा' चित्रपटाने खूप कमी वेळात उंच भरारी घेतली आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत आपले बजेट वसूल केले आहे. 'छावा' चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. 'छावा' (Chhaava) चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे.

'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल (vicky kaushal) पाहायला मिळत आहे. त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होत आहे. तर चित्रपटात महाराणी येसूबाईची भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकली आहे.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 20

  • 'छावा' पहिला दिवस 33.1 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 48.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 24.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 32 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 21.5 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 23 कोटी रुपये

  • नववा दिवस - 45 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 40 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 19.10 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 18.5 कोटी रुपये

  • तेरावा दिवस - 21.75 कोटी रुपये

  • चौदावा दिवस- 12 कोटी रुपये

  • पंधरावा दिवस - 400 कोटींचा टप्पा पार

  • सोळावा दिवस - 21 कोटी रुपये

  • सतरावा दिवस - 25 कोटी रुपये

  • अठरावा दिवस - 8.50 कोटी रुपये

  • एकोणिसावा दिवस - 5.50 कोटी रुपये

  • विसावा दिवस - 5.75 कोटी रुपये

  • एकूण - 477.65 कोटी रुपये

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'छावा' ने जगभरात 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करणार आहे. 'छावा'ने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. 'छावा'ने रिलीजच्या 20व्या दिवशी 5.75 कोटींची कमाई करून स्त्री 2, ॲनिमल, जवान, पठाण आणि पद्मावत या मोठ्या चित्रपटांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

  • स्त्री 2 - 5.65 कोटी रुपये

  • ॲनिमल - 5 कोटी रुपये

  • जवान - 5.1 कोटी रुपये

  • पठाण - 4.20 कोटी रुपये

  • पद्मावत - 3.75 कोटी रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Ram Mandir: तुम्ही जानवे घालता, मांसाहार करता का? राम मंदिराच्या CEO पदाच्या उमेदवारांना विचारले गेले १८ प्रश्न

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंविरोधात संजय राऊतांच्या हॉटेलमध्ये बैठका; खासदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT