
Chhaava Movie: संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरात छावा चित्रपटाचा बोलबाला आहे. या चित्रपटाने भारतात कमाईच्या बाबतीत ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणार असून १९ व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने ४७२ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटातील विकी कौशल आणि यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहावा याची तयारी सुरु आहे. यासाठी सोलापूरच्या एका बचत गटानेदेखील ५०० महिलांना हा चित्रपट मोफत दाखवला आहे.
सोलापुरात तेजस्विनी सामाजिक संस्था आणि शिवसेना शिंदे गटाने बचत गटातील 500 महिला आणि युवा कार्यकर्त्यांना छावा सिनेमा मोफत दाखवला आहे. यासाठी नवी वेस पोलीस चौकी पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील बाल शिवाजी आणि बाल जिजाऊ मासाहेब यांना घोड्यावरून नेत सोबत हलग्यांचा कडकडाट आणि 500 महिला एकत्रित जमून सिनेमा गृहाकडे चालत दाखल झाल्या.
सिनेमागृहात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या आदेशाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास महिलांना आणि युवा कार्यकर्त्यांना माहित व्हावा यासाठी 500 बचत गटातील महिला आणि युवा कार्यकर्त्यांना छावा सिनेमा मोफत दाखवल्याची माहिती शिवसेना शहर दिलीप कोल्हे यांनी दिली.
छावा चित्रपटाबद्दल
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित 'छावा' हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे विकी कौशलने साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका. शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या मराठी कादंबरीवर आधारित हा चित्रपट या वर्षीचा सर्वात उत्तम रिलीज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.