Viral Video  CANVA
मनोरंजन बातम्या

Viral Video : 'तौबा तौबा' गाण्यावर आज्जींचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून विक्की कौशलही झाला चकीत

Vicky Kaushal's Tauba Tauba Dance Viral Video: अभिनेता विक्की कौशलच्या गाण्यावर आज्जीबाईंतचा भन्नाट डान्स. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. विक्कीनेही केलं कौतुक.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय विकी कौशल याचा काही दिवसांपूर्वी 'बॅड न्यूज' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामधील 'तौबा तौबा' गाणं चाहत्यांच्या मनामध्ये प्रचंड गाजलं होतं. 'तौबा तौबा' हे गाणं प्रसिद्ध पंजाबी गायक करण औजल याने गायलं आहे. 'तौबा तौबा' या गाण्याने सर्वांना अगदी वेड लावलं आहे. या गाण्यामधील विकीच्या हूकस्टेपने सर्व चाहत्यांना भूरळ पाडली आहे.

प्रत्येक वयोगटातील लोकं या गाण्यावर त्यांचे डान्स करताना दिसतात. आजही विकीच्या या गाण्याचे वेड काही गेलं नाही. गाण्याची क्रेझ चाहत्यांच्या मनामध्ये कायम आहे. अशा परिस्थितीमध्ये आजीबाईंच्या ग्रुपने या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. आजीबाईंच्या या गाण्यावरील डान्स पाहून विकी कौशल देखील भारवला आहे.

आजीबाईंचा 'तौबा तौबा' गाण्यावरील व्हिडिओ शांताई सेकंड चाइल्डहूड या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला होता. आजीबाईंच्या ग्रुपचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.आजीबाईंच्या ग्रुपच्या डान्सची चर्चा सर्व सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आजीबाई विकीच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमधील आजीबाई कर्नाटकमधील वृद्धाश्रमातील आहे. या डान्सचा व्हिडिओवर विकी कौशलची नजर पडली आणि तो व्हिडिओ पाहून विकीला प्रतिक्रिया दिल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत. या व्हिडिओमध्ये आधी अभिनेता अमेय वाघ याने विकीला टॅग करत प्रतिक्रिया दिली आहे. अमेयने लिहिलं की, "विकी भाऊ तुमची या व्हिडिओला प्रतिक्रिया आलीच पाहिजे..." त्यानंतर विकीने या व्हिडिओला प्रतिक्रिया देत भावुक इमोजी शेअर करुन त्यावर एक हार्ट इमोजी शेअर केली आहे. विकीची प्रतिक्रियेनंतर या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

नुकताच विकी कौशलने लालबागच्या राज्याचं दर्शन घेतलं होतं.परंतु त्यावेळी त्याच्यासोबत पत्नी कतरिना कैफ दिसली नाही. या दरम्यान विकीची अभिनेत्री इशा देओलची भेट झाली. विकीच्या 'छावा' या आगामी चित्रपट उत्सुकता सर्व चाहत्यांना लागली आहे. या चित्रपटामध्ये विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये विकीसह अनेक कलाकारांनी काम केले आहे.

Edited By: Nirmiti Rasal.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT