Asha bhosle death  Saam tv
मनोरंजन बातम्या

आशा भोसलेंनी केली होती वयाच्या १० व्या वर्षी संगितविश्वात एन्ट्री; ८ दशकात किती गाणी गायली?

Asha bhosle death : आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालंय. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील यूग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Vishal Gangurde

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन

आशा भोसलेंनी केली होती १० व्या वर्षी संगीत क्षेत्रात प्रवेश

त्यांनी ८ दशकांत गायली १२ हजारांहून अधिक गाणी

भारतीय संगीतविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. आशा भोसले यांनी वयाच्या १० व्या वर्षी गाणे गाण्यास सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या गाण्याने अनेक पिढांच्या मनोरंजन केलं. त्यांनी ८ दशकात एकूण १२ हजारांहून अधिक गाणी गायली होती.

आशा भोसले यांनी एका मुलाखतीत त्यांच्या कारकि‍र्दीवर भाष्य केलं होतं. मुलाखतीत म्हटलं होतं की, 'पहिलं गाणं वयाच्या १० व्या वर्षी गायलं. मी एकूण २० भाषेतून १२००० हून अधिक गाणी गायली'. १२ हजारांहून अधिक गाणे गाणाऱ्या आशा भोसले यांच्या नावाची'गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड'मध्ये नोंद झाली होती.

आशा भोसले काय म्हणाल्या होत्या?

आशा भोसले यांनी सांगितलं होतं की, 'मी १० व्या वर्षी गाणं गायलं. १९४३ साली पहिलं गाणं गायलं. माइक घेऊन उभं राहून गाणे गायले. माझे हातपाय थरथर कापत होते. मला माइक काय असतं, हे देखील माहीत नव्हतं. माझ्या वडिलांनी माझे गाणे रेकॉर्ड केले होते. मी पहिलं गाणं गायलं, त्यावेळी आत्मविश्वास वाढला. माझी बहीण आधी गाणं गायची. नंतर मी गाणं गाऊ लागली'.

'माझे सर्व भाऊ-बहीण गाणे गातात. माझं आयुष्य सुरु झालं, आजही तिथेच उभी आहे. फिल्म लाइन अशी असते की, तुम्ही सकाळी १० वाजता स्टुडिओला पोहोचला, त्यानंतर तुम्ही रात्री १० किंवा ११ वाजता स्डुडिओला सोडता. तर कधी कधी सकाळी ८ वाजता स्डुडिओ सोडावा लागतो', असे त्या म्हणाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

Onion: व्यापाऱ्यांचा कांदा खरेदीस नकार, कांदा उत्पादकांचं टेन्शन वाढलं

Diesel Crisis: 7/12 शिवाय डिझेल नाही, सरकारची जाचक अट; शेतकऱ्यांचा संताप

Imran Khan: इम्रान खानची पत्नी रिलेशनशिपमध्ये, जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत बांधणार लग्नगाठ

Fact Check : आता सर्वांना मिळणार 7500 रुपये पेंशन? सरकारकडून निवृत्तीवेतनात भरमसाठ वाढ?

SCROLL FOR NEXT