Moong Dal Dosa: रोजचा साधा डोसा खाऊन कंटाळतात? बनवा मुग डाळीचा कुरकुरीत डोसा, वाचा सोपी रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

हेल्दी नाश्त्याचा सोपा पर्याय

रोज नाश्त्याला काय नवीन बनवायचं जे चवीला मस्त कुरकुरीत असेल आणि मुलंही पोटभर खातील असा पर्याय निवडत असाल तर थांबा.

moong dal dosa recipe

मुग डाळीचे डोसे

पुढील माहितीत आपण कुरकुरीत मुग डाळीचा डोसा कसा बनवायचा? हे जाणून घेणार आहोत. ही रेसिपी पटकन तयार होते आणि पचायलाही हलकी असते.

crispy dosa recipe

डोश्याचे साहित्य

मुग डाळ, हिरवी मिरची, आलं, लसूण, मीठ, पाणी, थोडं तेल इत्यादी साहित्य पुरेसं आहे.

crispy dosa recipe

डाळ भिजवून घ्यावी

मुग डाळ स्वच्छ धुऊन 6-7 तास भिजत ठेवा. जेवढा वेळ भिजत ठेवाल तितकी डोश्याची चव वाढेल.

crispy dosa recipe

पीठ तयार करा

भिजवलेली डाळ, मिरची, आलं, लसूण घालून मिक्सरमध्ये बारीक वाटा. पीठ थोडं घट्ट ठेवा आणि त्यात मीठ घाला.

healthy breakfast recipe

पीठाची कंसिस्टन्सी

डोशासाठी पीठ ना खूप पातळ ना खूप घट्ट ठेवा. योग्य कंसिस्टन्सीमुळे डोसा छान पसरतो.

healthy breakfast recipe

तवा गरम करा

डोसा बनवण्यासाठी तवा मध्यम आचेवर गरम करा. तव्यावर थोडं तेल लावून पीठ पसरवा.

instant dosa

डोसा भाजण्याची पद्धत

पीठ गोल फिरवत पसरवा आणि दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजा. गरमागरम डोसे नारळाची चटणी किंवा हिरवी चटणीसोबत सर्व्ह करा. तुम्ही सांबारसोबतही हे डोसे खाऊ शकता.

gluten free dosa

खास टिप्स

पीठात थोडं रवा किंवा तांदूळाचं पीठ घातल्याने डोसे कुरकुरीत होतात. तसेच तव्यावर पाणी शिंपडून मग डोसा केल्यावर तो चिकटत नाही.

gluten free dosa

NEXT: Jio Recharge: Jio युजर्ससाठी खुशखबर! 98 दिवसांच्या वैधता अन् इतर भन्नाट सुविधा, रिचार्जची किंमत फक्त...

Jio unlimited calling plan
येथे क्लिक करा