Famous Actor Death  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Veteran Bollywood Actor Passes Away : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड. अभिनेत्याने वयाच्या 95 वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याने अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले.

अभिनेत्याने वयाच्या ९५ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेता हा उत्तम निर्माता देखील होता.

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले. ५०, ६० आणि ७० च्या दशकात चित्रपटसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट देणारे अभिनेते सुदेश कुमार यांचे निधन झाले आहे. सुदेश कुमार यांचे शुक्रवारी (1 मे ) मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. वयाच्या ९५ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चाहत्यांनी आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.

TOI च्या वृत्तानुसार, श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे अभिनेत्याला सोमवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या बायकोने सांगितले की, "आम्ही त्यांना गुरुवारी घरी परत आणले, जिथे आम्ही उपचारांसाठी एक तात्पुरती वैद्यकीय व्यवस्था उभारली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला... " शुक्रवारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुदेश कुमार कारकीर्द

स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतात, १९३१ साली सरहद्दीवरील शहर असलेल्या पेशावर येथे सुदेश यांचा जन्म झाला. सुदेश लहान असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले. अभिनेत्याने एल्फिन्स्टन महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर कुमार यांनी पृथ्वीराज कपूर यांच्या थिएटर ग्रुपमध्ये प्रवेश केला.पृथ्वीराज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला 'पैसा' (१९५७) हा त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक होता. अभिनेत्याचे खरे नाव सुदेश धवन असे होते.

१९५९ मध्ये 'छोटी बहन' या चित्रपटातील छोट्या कॅमिओने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी आपल्या कारकीर्द अनेक मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. 'सारंगा', 'छोटी बहन', 'भरोसा', 'खानदान', 'वासू मेनन' आणि 'धरती' असे अनेक गाजलेले चित्रपट केले. त्यानंतर ते निर्मिती क्षेत्राकडे वळाले. निर्माता म्हणून त्याचा पहिला चित्रपट ‘मन मंदिर’ (१९७०) हा होता. त्यांनी १९७५ मधील 'उलझन' , 'बदलते रिश्ते' , 'ऑफ-बीट' या चित्रपटांची निर्मिती केली. १९८२ मध्ये जया नाईक (माहेरच्या धवन) यांच्याशी लग्न झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT