Actor Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, कॅन्सरसोबतची झुंज ठरली अपयशी

South Actor Death: साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता मदन बॉब यांचं निधन झालं. ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कॅन्सर झाला होता. आज सकाळी त्यांचे राहत्या घरी निधन झाले.

Priya More

Summary -

  • प्रसिद्ध तमिळ अभिनेते मदन बॉब यांचे ७१ व्या वर्षी निधन झाले.

  • कॅन्सरशी लढा दिल्यानंतर चेन्नई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • त्यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या

  • रजनीकांत, कमल हासन यांच्यासोबत सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

साऊथ सिनेसृष्टीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. नुकताच अभिनेता आणि कॉमेडियन कलाभवन नवस यांचे निधन झाले. या दु:खातून सावरत नाही तोवर साऊथ सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला. प्रसिद्ध अभिनेता मदन बॉब यांचं निधन झालं आहे. ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचे चाहते आणि कलाकार शोक व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि अभिनेते मदन बॉब यांचे निधन झाले. ७१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांनी चेन्नईच्या अड्यार भागातील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे साऊथ सिनेसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला.

मदन बॉब यांचे खरे नाव एस. कृष्णमूर्ती होते. त्यांनी ४ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत २०० हून अधिक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. १९९० आणि २००० च्या दशकात ते घराघरात लोकप्रिय झाले. त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या सुपरस्टार्ससोबत काम केले आणि नाव आणि प्रसिद्धी मिळवली. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील काम केले होते.

मदन यांनी १९८०च्या दशकात चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 'नेंगल केतवई' (१९८४), 'वानामे इलाई' (१९९२) आणि 'तेवर मगन' यांसारख्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना खरी ओळख मिळाली. नंतर त्यांनी 'साथी लीलावती', 'चंद्रमुखी', 'कावलन', 'रन', 'वरालारू' आणि 'वासूल राजा एमबीबीएस' यासारख्या अनेक हिट कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी रजनीकांत, कमल हासन, विजय, सूर्या आणि अजित यासारख्या बड्या स्टार्ससोबत सुपरहिट चित्रपटात काम केले.

चित्रपटांव्यतिरिक्त मदन बॉब छोट्या पडद्यावरही खूप लोकप्रिय होते. त्यांनी सन टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो 'असथा पोवाथु यारू' मध्ये न्यायाधीशाची भूमिका साकारली होती. या शोमधील त्यांचे विनोदी भाषण आणि मजेदार प्रतिक्रिया सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडल्या. मदन एक उत्कृष्ट अभिनेते, विनोदी कलाकार तसेच एक उत्तम संगीतकार होते. ते त्यांच्या आठ भावंडांमध्ये आठवे होते आणि ते म्हणायचे की त्यांच्या कुटुंबातील आणि बालपणीच्या वातावरणामुळे ते संगीत आणि विनोदाकडे वळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT