Veteran Bollywood actor Pradeep Rawat passes away saam tv
मनोरंजन बातम्या

Pradeep Rawat Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा

Pradeep Rawat Death: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांचे आज, ४ ऑगस्ट रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 'महाभारत' ते 'गजनी' अशा विविध कलाकृतींमध्ये दमदार अभिनय केला होता.

Bharat Jadhav

प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.

'गजनी', 'लगान', 'सरफरोश' आणि 'महाभारत'मधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

ते दीर्घकाळ कॅन्सरशी झुंज देत होते आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

'लगान', 'सरफरोश' आणि 'गजनी' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन झालंय. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे सहकलाकार आणि जवळचे मित्र यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

प्रदीप रावत हे बऱ्याच काळापासून कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत होते. सुरुवातीला त्यांच्यावर मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंतर दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र प्रदीप रावत यांची मृत्यूशी असलेली झुंज अपयशी ठरली.

२१ जानेवारी १९५२ रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे जन्मलेल्या प्रदीप रावत यांनी १९८० च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. बी. आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' या पौराणिक मालिकेद्वारे त्यांना खरी ओळख आणि प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्यांनी गुरू द्रोणाचार्यांचा पुत्र असलेल्या अश्वत्थामा या अजरामर आणि प्रभावी व्यक्तिरेखेची भूमिका साकारली. त्यांचा दमदार आवाज आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व यांचा प्रेक्षकांवर इतका खोलवर प्रभाव पडला की, ते रातोरात चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख चेहरा बनले होते. त्यांचा दमदार आवाज आणि व्यक्तिमत्त्व यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेनंतर या अभिनेत्याने मागे वळून पाहिले नाही.

अभिनेता प्रदीप रावत अशा कलाकारांपैकी एक होते ज्यांनी बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी अशा दोन्ही क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर काम केले. त्यांनी आमीर खानच्या 'सरफरोश' चित्रपटात 'सुलतान'ची भूमिका साकारली होती, तसेच आशुतोष गोवारीकर यांच्या 'लगान'मध्ये ते 'देवा सिंग सोढी'च्या भूमिकेत दिसले होते. यासह त्यांनी आमीर खानच्या 'गजनी' चित्रपटात 'गजनी धर्मात्मा'ची भूमिका साकारली. या भूमिके जी प्रेक्षकांकडून अत्यंत पसंतीस उतरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT