ज्येष्ठ गायकाचे निधन
गायकाने वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संगीत विश्वावर शोककळा
मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पीबो ब्रायसन (Peabo Bryson) यांचे निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २ जून २०२६ रोजी गायकाची प्राणज्योत मालवली. कलाकार आणि चाहते मंडळींनी सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून गायकावर श्रद्धांजली वाहिली आहे.
Varietyच्या वृत्तानुसार, गायक पीबो ब्रायसन यांच्या मृत्यूचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. पण ब्रायसन यांना गेल्या आठवड्याच्या शेवटी पक्षाघाताचा (stroke) झटका आला होता. त्यावरच त्यांच्यावर उपचार सुरू होते. पीबो ब्रायसन यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गायक पीबो ब्रायसन यांचा जन्म १३ एप्रिल १९५१ रोजी झाला. १९७० च्या दशकापासून ते २०१० च्या दशकापर्यंत अनेक गाजलेली गाणी दिली; अशा प्रकारे त्यांची प्रतिभा अनेक दशकांपर्यंत बहरत राहिली. गायकाने आपल्या गाण्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. 'A Whole New World' आणि 'Beauty and the Beast' यांसारख्या ऑस्कर-विजेत्या डिस्ने क्लासिक चित्रपटांमधील गाण्यांना आपला आवाज दिल्याने त्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. पीबो ब्रायसन यांना दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाले होते.
पीबो ब्रायसन हे 'R&B' शैलीतील गाण्यांसाठी विशेष ओळखले गेले. त्यांना 'Tonight, I Celebrate My Love', 'You’re Looking Like Love to Me' आणि 'As Long as There’s Christmas' या गाण्यांमुळे लोकप्रियता मिळाली. साउथ कॅरोलिना येथील मूळ रहिवासी असलेल्या ब्रायसन यांनी १९७० च्या दशकात 'Moses Dillard and the Tex-Town Display' या टीम एक भाग म्हणून संगीत क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा पहिला अल्बम १९७६ मध्ये प्रदर्शित झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.